घरताज्या घडामोडीRepublic Day : ॲडॉल्फ हिटलरने नेताजींची माफी मागितली होती

Republic Day : ॲडॉल्फ हिटलरने नेताजींची माफी मागितली होती

Subscribe

यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्मदिनापासून म्हणजे २३ जानेवारीपासून होणार आहे. आतापर्यंतच्या परंपरेनुसार २४ जानेवारीपासून या कार्यक्रमांना सुरूवात होत असे. सुभाषचंद्र बोस यांचा बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला होता. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजलीही वाहिली जाते. भारतीय स्वातंत्र्यांच्या संग्रामात त्यांचे महत्वाचे असे योगदान होते. जय हिंदची घोषणा त्यांनीच दिली होती. सुभाष चंद्र बोस यांची माफी मागण्याची वेळ ही हुकुमशाही नेता म्हणून ओळख असलेल्या हिटरवर आली होती.

सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनाशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टी या तरूणांसाठी अतिशय खास आणि प्रेरणादायी अशा आहेत. सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंद यांना आपले आध्यात्मिक गुरू मानायचे. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. इंग्रजांविरोधात लढणारी एक सैन्याची तुकडी ही आझाद हिंद सेनेच्या रूपात कार्यरत होती. बोस यांनी महिलांच्या रानी झांसी रेजिमेंटचीही स्थापना केली होती. महात्मा गांधी राष्ट्रपित ही उपाधी सर्वात आधी ही सुभाषचंद्र बोस यांनीच दिली. त्यांनी १९४४ साली रेडिओवर गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. त्यानंतर गांधीजींनीही सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हटले.

- Advertisement -

इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युद्ध करणे गरजेचे असल्याची भूमिका सुभाष चंद्र बोस यांची होती. पण काही कालावधीने अहिंसा आणि अहकार आंदोलनाने प्रभावित होत त्यांनी अहिंसा आणि अहकार आंदोलनातून प्रेरणा घेत भारत छोडो आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली. तुम मुझे खूप दो, मै तुम्हे आजादी दुंगा ही त्यांची घोषणा अत्यंत लोकप्रिय झाली.

त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना आणि आजाद हिंद रेडिओची स्थापना केली. २९ मे १९४२ रोजी सुभाष चंद्र बोस हे जर्मनीचे सर्वोच्च नेता असलेल्या अॅडॉल्फ हिटलरची भेट घेतली होती. पण त्यावेळी हिटलरला भारतीय विषयांमध्ये खास इच्छा नव्हती. त्यांनी सुभाषजींना कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही. पण नेताजींनी स्पष्ट केले की मैत्रीमध्ये कोणताही अडथळा येता कामा नये. त्यासोबतच यापुढच्या कालावधीतील मिशनसाठी त्यांनी हिटलरची मदत मागितली.

- Advertisement -

हिटलरने लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी भारतीय लोकांबाबच वाईट भाषा वापरली होती. या उल्लेखामुळेच सुभाषचंद्र बोस हे हिटलरवर नाराज झाले होते. हिटलरला ही गोष्ट कळताच त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची माफी मागितली. त्यानंतरच्या ‘माइन काम्फ’च्या आवृत्तीमध्ये हिटलरने ही चूक सुधारत भारतीयांचा उल्लेख असलेला परिच्छेद काढून टाकण्याचे वचन दिले. आपल्या संघर्षपूर्ण आणि व्यस्त जीवनातही नेताजी सुभाष चंद्र बोस हे लेखनासाठी अतिशय उत्सुक होते. एक भारतीय यात्री, द इंडियन स्ट्रगल यासारखी त्यांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध झाली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -