घरक्रीडाCorona Positive: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण

Corona Positive: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतीय संघातील अंडर-१९ च्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्याने स्वत: ट्विट करत माहिती देखील दिली आहे. यावेळी घरीच क्वारंटाईन असल्याचं हरभजन सिंगने सांगितलं आहे.

माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं असून सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी शक्य तितक्या लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी सर्वांना विनंती करतो. सर्वांनी सुरक्षित रहा आणि काळजी घ्या, असं आवाहन हरभजन सिंगने ट्विट करत केलंय.

- Advertisement -

राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता

भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर हरभजन सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह राजकारणात नवीन इनिंग सुरू करण्याविषयी चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. त्यामुळे आता हरभजन सिंग लवकरच राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना विचारणार प्रश्न


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -