घरताज्या घडामोडीAirport Check in Baggage Rules: एअरपोर्ट जाताय? तर प्रवाशांनी नव्या 'वन हँड...

Airport Check in Baggage Rules: एअरपोर्ट जाताय? तर प्रवाशांनी नव्या ‘वन हँड बॅग’ चे नियम जाणून घ्या

Subscribe

विमानतळांवर होणाऱ्या गर्दीची काही प्रवाशांनी आणि लोकांनी नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे चेकींगवेळी होणाऱ्या गर्दीची आणि प्रवाशांच्या सुरक्षेविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरक्षा नियमकांकडून गर्दी कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

तुम्ही जर विमानाने प्रवास करणार असाल तर विमानतळावर जाण्याआधी एअरलाइन्सच्या नव्या वन हँड बँगचे नियम माहिती असणे गरजेचे आहेत. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने एअरलाइन्सना विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ एक हँडबँग घेऊन प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर विमान प्रवासासाठी एक बँग आणि त्यासोबत आणखी दोन छोट्या बँग घेऊन जात असाल तर तुम्हाला विमानाने प्रवास करता येणार नाही. सिक्युरिटी रेगुलेटरने एअरलाइन आणि विमानतळांना याबाबत सूचना जारी केल्या आहेत. हा नियमामुळे विमानतळावर प्रवाशांची होणारी गर्दी फार कमी होईल असे विमानतळ सुरक्षा नियमकांचे म्हणणे आहे.

विमानतळांवर होणाऱ्या गर्दीची काही प्रवाशांनी आणि लोकांनी नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे चेकींगवेळी होणाऱ्या गर्दीची आणि प्रवाशांच्या सुरक्षेविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरक्षा नियमकांकडून गर्दी कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

- Advertisement -

BCAS ने लिहिले पत्र

सुरक्षा नियामकाने यासंदर्भात एअरलाइन आणि विमानतळाला मेमो जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, प्रवासी विमान प्रवासासाठी येताना तीन चार हँड बँग घेऊन येतात. तीन बँगांचे क्लियरेंस देण्यासाठी वेळ लागतो. अनेक वेळा यामुळे विमानतळावर मोठ मोठ्या रांगा लागतात. यामुळे विमानतळावर मोठी गर्दी देखील पहायला मिळते. गर्दीमुळे प्रवाशांमध्ये देखील त्रास सहन करावा लागतो. यामुळेच एक परिपत्रक जारी करुन सर्व प्रवाशांना या नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, एअरलाइन्स आणि एअरपोर्टवर प्रवाशांनी केवळ वन हँड बँग आणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षा देणे सोपे होईल आणि समस्यांवर योग्य उपाय करुन निराकरण करता येईल. एअर लाइन्सवर लोकांना हे नियम पटवून देण्यासाठी काही कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले असून सर्वांनी हँड बँग नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

एअरलाइन्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वन हँड बँगचा नियम लागू करणे शक्य नाही. एका बँगमधून प्रवासी सर्व सामान घेऊन जाऊ शकत नाही. एका मोठ्या बँगेसोबत 2 बँग असतील तर त्यात ते त्यांचे लहान मोठे सामान घेऊ जाऊ शकतात. त्यामुळे वन हँड बँगेचे नियम लागू करणे शक्य नाही.


हेही वाचा – केजरीवाला सरकारचा प्रस्ताव नामंजुर; दिल्लीत Weekend Curfew कायम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -