घरताज्या घडामोडीCM योगी विजेच्या मुद्द्यावर करत होते आपल्याच सरकारचे कौतुक अन् झाली बत्ती...

CM योगी विजेच्या मुद्द्यावर करत होते आपल्याच सरकारचे कौतुक अन् झाली बत्ती गुल

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूकांमध्ये वीजेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात वीजेच्या मुद्द्यावरून जोरदार जुंपली आहे. एका बाजूला समाजवादी पार्टीने सरकार आल्यावर 300 यूनिट फ्री वीज देण्याचे वचन दिले होते मात्र भाजपने पलवार करताना म्हटलं की, जेव्हा समाजवादी पार्टीच्या हाती सत्ता होती तेव्हा 300 यूनिट इतकी वीज देऊ शकली नाही. तर फ्री मध्ये वीज कुठून देणार ? असा सवाल केला. दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूकांमध्ये वीजेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात वीजेच्या मुद्द्यावरून जोरदार जुंपली आहे. एका बाजूला समाजवादी पार्टीने सरकार आल्यावर 300 यूनिट फ्री वीज देण्याचे वचन दिले होते मात्र भाजपने पलवार करताना म्हटलं की, जेव्हा समाजवादी पार्टीच्या हाती सत्ता होती तेव्हा 300 यूनिट इतकी वीज देऊ शकली नाही. तर फ्री मध्ये वीज कुठून देणार ? असा सवाल केला. दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे. योगी आदित्यनाथ बुलंदशहरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.त्यावेळी सीएम योगी यांनी वीजेच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारचे कौतुक केले, मात्र नेमकी त्याचवेळी लाईट गेली. त्यामुळे हा वीजेचा विषय सुरु असताना नेमका हा व्हिडिओ सोशल मिडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?

वास्तविक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून भाजपासाठी वोट मागत आहेत. 23 जानेवारीला ते उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर शहरामध्ये ‘प्रत्येक घरात भाजप’ या कार्यक्रमाबाबत संबोधन करत होते. मात्र, नेमकी त्याच वेळेस लाईट गेली आणि सगळा गोंधळ उडाला. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, योगी आदित्यनाथ भाषणाच्या दरम्यान,सरकारने राबवलेल्या योजनांची आणि केलेल्या विकासकामांची मांडणी करत होते. या भाषणादरम्यान ते म्हणाले की, “आपल्या सरकारमध्ये वीजपुरवठा करताना उच्च नीच हा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वीजेचा पुरवठा केला जात आहे,त्यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन एक्सप्रेसवे प्रमाणे निरंतर पुढे चालत आहे” त्यांच्या या वक्तव्यानंतर नेमकी याचवेळी संपूर्ण स्टेजची लाईट गेली आणि माइकसुद्धा बंद झाला.

मात्र त्यानंतरही योगी आदित्यनाथ आपले संबोधन न थांबवता सुरुच ठेवतात. थोड्याच वेळात लाईट पुन्हा येते. बुलंदशहरमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाषणात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून,नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर संदीप सिंह राजदान यांनी लिहिले आहे की, ‘ आजकाल टेक्नोलॉजीसुद्धा पीएम आणि सीएमचा साथ देत नाही’

- Advertisement -

हे ही वाचा – नितीन राऊतांकडून ऊर्जा क्षेत्रातला लेटर बॉम्ब, अन् मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे आश्वासन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -