घरताज्या घडामोडीरेड वाइन प्यायल्याने कोरोना संक्रमणाचा धोका 17 टक्क्यांनी कमी ; संशोधनातून माहिती...

रेड वाइन प्यायल्याने कोरोना संक्रमणाचा धोका 17 टक्क्यांनी कमी ; संशोधनातून माहिती समोर

Subscribe

व्हाइट वाइन आणि शॅंपियनसारखे ड्रिंक्ससुद्धा कोरोनाचे संक्रमण होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते. संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून 1 ते 4 ग्लास व्हाइट वाइन किंवा शॅंपियन पितात त्यांना कोरोनाचा धोका कमी प्रमाणात आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. या भयानक कोरोनावर मात करण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात आले आहेत. या संशोधनात खाण्या पिण्याशी निगडीत अनेक सल्ले देण्यात आले होते. नुकतंच फ्रंटीयर्स इन न्यूट्रीशन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक आठवड्यातून 5 ग्लासपेक्षा जास्त प्रमाणात रेड वाइनचे सेवन करत असणाऱ्यांना कोरोना व्हायरसचे संक्रमण 17
टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

एका वृत्तानुसार, चीनच्या शेनझेन कांगनिंग हॉस्पीटलमध्ये ब्रिटिश नागरिकांच्या माहितीचे ऍनालिसीस करुन रिसर्च तयार केला आहे. यामध्ये संशोधकांनी ब्रिटेनच्या लोकांची दारु पिण्याच्या सवयी आणि कोरोना व्हायरसच्या इतिहास अशा दोन्हींची तुलना करुन अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार,रेड वाइनमध्ये ‘पॉलीफेनोल’ नावाचे कंपाउंड असते. जे ताप आणि श्वासासंबंधीत अनेक आजारांवर निदान करण्यासाठी फायदेशीर ठरते. हेच या रेड वाइनच्या सेवनाने कोरोना संक्रमणाचा खतरा कमी होण्यामागचा मुळ कारण आहे. व्हाइट वाइन आणि शॅंपियनसारखे ड्रिंक्ससुद्धा कोरोनाचे संक्रमण होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते. संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून 1 ते 4 ग्लास व्हाइट वाइन किंवा शॅंपियन पितात त्यांना कोरोनाचा धोका कमी प्रमाणात आहे.

- Advertisement -

कोरोनामध्ये बीयर आणि सायडर पिणे रिस्की

संशोधनानुसार, बीयर आणि सायडर पिणाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याचे शक्यता 28 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जर तुम्ही या ड्रिंक्सचे सेवन 5 ग्लासापेक्षा अधिकवेळा करत असाल तर तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करणे अनिवार्य आहे.


हे ही वाचा – कोस्टल रोड झाला नाही तरी चालेल, पण मुलांसाठी, महिलांसाठी पैसे दिले पाहिजेत – यशोमती ठाकूर

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -