घरताज्या घडामोडीकोस्टल रोड झाला नाही तरी चालेल, पण मुलांसाठी, महिलांसाठी पैसे दिले पाहिजेत...

कोस्टल रोड झाला नाही तरी चालेल, पण मुलांसाठी, महिलांसाठी पैसे दिले पाहिजेत – यशोमती ठाकूर

Subscribe

शरद पवार आहेत तोवर महाविकास आघाडी सरकार बरीच कामे करू शकते असे देखील त्या म्हणल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांचे विशेष कौतुक केले.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य महिला आयोगाचा नुकताच 29 वा वर्धापन दिन पार पडला. (29th Anniversary of State Women Commission) राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता या विषयावर संवाद साधताना राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur)  यांनी महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केले.  एकवेळ कोस्टल रोडला पैसे दिले नाही तरी चालतील पण राज्यातील मुले आणि महिलांना पैसे द्या त्यासाठी मी भांडतेय, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. कर्नाटकमध्ये 25 किलोमीटरवर शौचालये असतील तर आपल्याकडे का नाही असा सवाल यावेळी यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या, पुढच्या तीन वर्षात महाविकास आघाडी सरकार महिला आयोगाच्या व्यासपीठावरुन अनेक कामे करू शकतात. ज्यामुळे घरगुती हिंसाचार, कामाचे ठिकाणी होणारे छळ या विरोधात लढण्यासाठी त्यांना ताकद मिळू शकते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ही कामे करण्याकडे लक्ष द्यावे असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

महिलांसाठी महत्त्वाची घोषणा

महिला आयोगाच्या कार्यक्रमात बोलताना यशोमती ठाकूर महिलांसाठी नव्या टोल फ्री क्रमांकाची घोषणा केली. 155209 असा हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर महिला आपल्या तक्रारी दाखल करू शकतात. तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना मदत मिळेल. येत्या 7-8 दिवसात हा क्रमांक महिलांसाठी कार्यरत होईल, असे त्या म्हणाल्या. राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

शरद पवार आहेत तोवर महाविकास आघाडी सरकार बरीच कामे करू शकते असे देखील त्या म्हणल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )  आहेत म्हणून महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government)  जोरदार सुरू आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – मुंडे, महाजन, पर्रिकरांची पुढची पिढी कुठे आहे ? संजय राऊतांचा भाजप नेतृत्वाला सवाल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -