घरताज्या घडामोडीअपर जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाहून महसूलच्या फाईल ताब्यात

अपर जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाहून महसूलच्या फाईल ताब्यात

Subscribe

खाजगी लोकांकडून कामे केली जात असल्याचा संशय

अप्पर जिल्हाधिकारी दत्त प्रसाद नडे यांच्या कामकाजावर संशय व्यक्त करत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेल्या फाईल्स प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबत थेट विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते त्यामुळे पुन्हा एकदा महसूल विभाग चर्चेत आला आहे. या फाईल नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या होत्या, याबाबत काय तक्रारी प्राप्त झाल्या याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांचे गोल्फ क्लब मैदानाजवळ, पर्यटन विकास महामंडळ कार्यालय परिसरात शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाजूला असेलेले आणखी एक निवासस्थान अपर जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात होते. या निवासस्थानात काही खासगी लोकांचा राबता असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून फाईल निकाली निघत नसल्याच्या अनेक तक्रारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यानूसार या प्रकरणी संशय बळावला. या तक्रारीनुसार अपर जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी जमीन व्यवहाराशी निगडीत प्रकरणे निकाली काढली जात असल्याचे समजते. त्यानूसार ही कारवाई करण्यात आल्याचीही चर्चा आहे. १७५ फाईल्स पेडिंग असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार या सर्व फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कारवाईबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता, यावृत्ताला त्यांनी दुजोरा दिला मात्र, घर सील करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे म्हणणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

असा आहे आरोप
अपर जिल्हाधिकारी यांनी शासकीय सुटी असतांना ५६/२०२१ या विवादित अर्जाचा निकाल दिला. मात्र हा निकाल २० डिसेंबर रोजी फलकावर लावण्यात आला. तब्बल दोन महिन्यांनी निकाल लावल्याने अपिलकार याना अपिलात जाण्याची संधी मिळाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आल्याचे समजते. तसेच हे निकाल खासगी व्यक्तीकडून बनवून घेतले गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -