घरताज्या घडामोडीआनंद दिघेंच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडेंचा 'धर्मवीर' हा दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडेंचा ‘धर्मवीर’ हा दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न आणि त्यानंतर गाजलेल्या 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटानंतर आता प्रविण तरडे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि ठाण्यातील शिवसेनेचे स्थान बळकट करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ख्याती असणाऱ्या दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे यांचा आणखी एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न आणि त्यानंतर गाजलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर आता प्रविण तरडे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि ठाण्यातील शिवसेनेचे स्थान बळकट करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ख्याती असणाऱ्या दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉंच झाले आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास एक व्यक्ती, एक राजकीय नेता आणि माणुसकीची जाण असणारा अशा व्यक्तीमत्त्वाच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव ‘धर्मवीर’ असे करण्यात आले आहे. या चित्रपटाचा मोशन पोस्टर लॉंच झाला असून यात कोणते कलाकार भुमिका साकारणार ही माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या ठाण्यात सुरु आहे.

अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून स्थान निर्माण केलेले मंगेश देसाई साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Wedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध बिजनेस मॅनसोबत थाटला संसार


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -