घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशात आज कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा कमी, 959...

India Corona Update: देशात आज कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा कमी, 959 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

अॅटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे 4.43 टक्के झाले आहे. यात देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 15. 77 टक्के झाला आहे.

भारतातील कोरोना रुग्णसंख्येत सतत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात गेल्या 24 तासात अडीच लाखांहून कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आज 2 लाख 09 हजार 918 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळलेत. सलग दुसऱ्या दिवशी या राज्यात 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतात आज 18 लाख 31 हजार 268 कोरोनाचे अॅटिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे अॅटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे 4.43 टक्के झाले आहे. यात देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 15. 77 टक्के झाला आहे.

- Advertisement -

भारतात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरु आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढला ही चिंतेची बाब आहे. रविवारी देशात 893 तर शनिवारी 871 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र आज 959 कोरोना मृतांची नोंद झाली आहे.

राज्ये भारतातील सर्वाधिक संक्रमित राज्यांबद्दल बोलायचे झाल्यास, केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 51,570 रुग्णांची नोंद झाली आहेत. यानंतर कर्नाटकात 28,264 रुग्ण, महाराष्ट्रात 22,444 रुग्ण, तामिळनाडूमध्ये 22,238 रुग्ण, आंध्र प्रदेशात 10,310 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. या 5 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 64.22 टक्के रुग्ण आढळले आहेत. यात एकट्या केरळमध्ये 24.57 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

देशात 18.31 लाख अॅटिव्ह केसेस

भारतात गेल्या 24 तासात 2,62,628 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3,89,76,122 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रिकव्हरी रेट 94.37 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, अॅटिव्ह रुग्णांची संख्या घट होऊन 18,31,268 वर आली आहेत. गेल्या 24 तासात अॅटिव्ह रुग्णांमध्ये 53,669 ने घट झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत 1,66,03,96,227 लसीकरण पूर्ण झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -