घरदेश-विदेशभोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

Subscribe

भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह स्वत: ट्विट करत म्हटले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतेय. या 2 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घेत आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेय. तसेच आम्हाला तुमची काळजी आहे. आपण सर्व निरोगी रहावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना. असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी मी दररोज गोमूत्र पिते, म्हणून कोरोना झाला नाही असा दावा केला होता. यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचे इन्फेक्सन बरे होते. असं म्हणत गोमूत्रच्या सेवनाने कोरोना होत नाही. मला कोरोनावर उपाय म्हणून इतर कोणतं औषध घेण्याची गरज पडत नाही. मला कोरोनाही झाला नाही. गायीचे मूत्र आपल्यासाठी जीवनदायी असते. असं त्यांनी सांगितले होते. प्रज्ञा सिंह ठाकुर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला होता. ज्यात त्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना दिसत होत्या. मात्र आज त्यांनी कोरोनाची लागण झाली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -