घरताज्या घडामोडीAttack On Owaisi : उत्तर प्रदेशातील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींना Z+ सुरक्षा, केंद्र...

Attack On Owaisi : उत्तर प्रदेशातील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींना Z+ सुरक्षा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर काल(गुरूवार) गोळीबार करण्यात आला. हापूर जिल्ह्यातून प्रचारसभेहून परतत असताना त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु ओवैसींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय रीझर्व्ह पोलीस दलाची झेड प्लस सुरक्षा असदुद्दीन ओवैसी यांना संपूर्ण देशभरात दिली जाणार असल्याचे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

ओवैसी हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारावर आहेत. हापूर जिल्ह्यातून दिल्लीकडे जाताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. ही घटना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. तसेच यासंदर्भात खासदार ओवैसी यांनी ट्वीटरद्वारे माहिती दिली आहे.

काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात चार गोळ्या झाडल्या असून ३ ते ४ लोकं होते. अज्ञात जागेवरून फरार झाले असून त्यांनी जागेवरच शस्त्र सोडली. माझी गाडी पंक्चर झाली होती. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. तसेच मी आता सुरक्षित आहे, असं ट्विट ओवैसी यांनी केलं होतं.

- Advertisement -

दरम्यान, ओवैसी यांच्यावरील हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशातील पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांची चौकशी करण्यात आली. हिंदूंविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्या मनात संपात होता. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा : पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू, 3 जखमी; याप्रकरणी तिघांना अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -