घरताज्या घडामोडीApp Based Cab : प्रवासासाठी गाडी बुक करताय? मग सावधान, या कंपन्या...

App Based Cab : प्रवासासाठी गाडी बुक करताय? मग सावधान, या कंपन्या तुमची माहिती जगभर विकतायत

Subscribe

हल्लीच्या युगात डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात अॅप आधारित वाहतुकीवर हल्ली बहुतांश लोक अवलंबून असतात. प्रवासी सोयीस्कर आणि स्वस्त प्रवासासाठी, OLA, UBER किंवा Rapido यांसारख्या अॅप्सचा अवलंब करतात. यावेळेल लोक गरजेनुसार कार,ऑटो आणि बाइकची बुकिंग करतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास हा सुकर होतो. मात्र, या गाड्यांची बुंकिग करत असताना तुमचा वैयक्तिक डेटा त्या व्यक्तींकडे पोहोचवत आहे.

हल्लीच्या युगात डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात अॅप आधारित वाहतुकीवर हल्ली बहुतांश लोक अवलंबून असतात. प्रवासी सोयीस्कर आणि स्वस्त प्रवासासाठी, OLA, UBER किंवा Rapido यांसारख्या अ‍ॅप्सचा अवलंब करतात. यावेळेल लोक गरजेनुसार कार,ऑटो आणि बाइकची बुकिंग करतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास हा सुकर होतो. मात्र, या गाड्यांची बुंकिग करत असताना तुमचा वैयक्तिक डेटा त्या व्यक्तींकडे पोहोचवत आहे. त्यामुळे कंपनी तुमच्याबद्दलची माहिती साठवून ठेवत असते. कंपनीचा यामागील एकच हेतू असतो की, डेटा सर्विसला उत्तम बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र यात तितके तथ्य नाही. कारण ही कंपनी तुमचा डेटा एका थर्ड पार्टीला विकत आहे.

रिपोर्टनुसार, या कंपन्या तुमचा डेटा जाहिराती देणाऱ्या कंपन्यांना विकतात. सर्फसार्कचे सीईओ व्‍यटौटास काझियुकोनिस यांच्या मते, या अभ्यासात ३० राइड हेलिंग अॅप्सचा समावेश करण्यात आला होता. यापैकी, 9 कंपन्या अशा आढळल्या ज्या जाहिरातींसाठी त्यांच्या ग्राहकांचे तपशील थर्ड पार्टीला विकत आहेत. कंपन्या डिटेल्समध्ये वापरकर्त्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि ईमेल देतात.

- Advertisement -

या अ‍ॅप्समध्ये सर्वाधिक डेटा असतो

नुकतंत सायबर सिक्योरिटी कंपनी सर्फसार्कने याबाबत एक अभ्यास केला आहे. त्यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की Grabtaxi, Yandex Go आणि Uber या कंपन्या त्यांच्या ग्राहकांचा सर्वाधिक डेटा साठवत आहेत. OLA आपल्या ग्राहकांचा डेटा देखील गोळा करते. त्याचबरोबर बाईक टॅक्सीपासून सुरू झालेली रॅपिडो देखील ग्राहकांचा डेटा गोळा करत आहे, परंतु इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी डेटा साठवत असते.


हे ही वाचा – Republic Day Parade : महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रियतेत पहिलं बक्षिस, युपीचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -