घरताज्या घडामोडीRanbir Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं ठरलं लग्न? म्हणाली....

Ranbir Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं ठरलं लग्न? म्हणाली….

Subscribe

बॉलीवूडमधील अनेक कलाकार जोडप्यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर एकमेकांसोबत लग्न केले. यातून त्यांनी आपले रिलेशनशिप यशस्वी करुन दाखवले आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या अनेक चर्चा होत आहेत. मात्र अनेकदा या अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे. दोघेजण जवळपास चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीत त्या दोघांना लग्नाबाबत प्रश्न विचारला असता. आलिया भट्टने मजेशीर उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘मी मनामध्ये रणबीर कपूरशी लग्न करुन मोकळी झाली आहे. मला मनातून असे वाटते की, मी खूप दिवसांपूर्वी रणबीरसोबत लग्न केले आहे. मला असे वाटते की, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण लपलेले असते. जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा हा क्षण खूप सुंदर पद्धतीने पार पाडला जाईल.

View this post on Instagram

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

- Advertisement -

2020 च्या सुरुवातीला, रणबीर कपूरने एका मुलाखतीत आलियाचे वर्णन करताना या नात्याची पुष्टी केली होती आणि सांगितले होते की जर कोरोना नसता तर त्याने 2020 मध्येच आलियाशी लग्न केले असते. यानंतर दोघेही अनेकवेळा जाहीरपणे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. आलिया अनेकदा रणबीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

- Advertisement -

या दोघांच्याही वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर,आलियाचा पुढचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यानंतर ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या अॅनिमल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हे ही वाचा – Ajinkya Rahane : चांगली कामगिरी करुनही ODI मधून वगळले, अजिंक्य रहाणेकडून नाराजी व्यक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -