घरताज्या घडामोडीHijab Controversy : हिजाब वादावर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेला शबाना आजमी यांचे उत्तर,...

Hijab Controversy : हिजाब वादावर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेला शबाना आजमी यांचे उत्तर, म्हणाल्या…

Subscribe

कंगनाने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टच्या स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. ज्यात १९७३ चा इराण आणि आताच्या इराणच्या परिस्थिती दाखवण्यात आली होती

Shabana Azmi Slams Kangana Ranaut Over Hijab Controversy : सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंगा गर्ल कंगना रणौतने गुरुवारी या वादावर एक पोस्ट शेअर तिची प्रतिक्रिया दिली होती. कंगनाच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी तिचे समर्थन केले तर अनेकांनी तिला फटकारले देखील. कंगनाच्या या पोस्टवर अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनावर निशाणा साधलाय.

शाबाना आझमी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘जर मी चुकत असेन तर सांगा. माझ्या माहितीप्रमाणे अफगाणिस्तान हा ईश्वराशासित देश आहे. मी शेवटचे तपासले होते तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश असल्याचे मला दिसले ?’

- Advertisement -

कंगनाने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टच्या स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. ज्यात १९७३ चा इराण आणि आताच्या इराणच्या परिस्थिती दाखवण्यात आली होती. त्यातील पहिल्या फोटोमध्ये इराणी महिला बिकीनी घालून होत्या तर दुसऱ्या फोटोमध्ये इराणी महिला बुरखा घालून होत्या. हा फोटो शेअर करत कंगनाने म्हटले होते की, ‘जर हिंमत दाखवायचीच असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता राहून दाखवा. आधी स्वत:ला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका’, असे म्हणत कंगनाने तिचे मत मांडले होते.

- Advertisement -

शबाना आझमी यांच्या आधी त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर यांनी देखील हिजाबवर आपली प्रतिक्रिया देत म्हटले होते की, ‘मी कधीच हिजाबच्या बाजूने नव्हतो. मुलींच्या छोट्या ग्रुपला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हिच त्यांची मर्दानगी आहे का ?’


हेही वाचा – Hijab Row : हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली हिंमत असेल तर…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -