घरताज्या घडामोडीNora Fatehi Struggle : नोरा फतेही अवघ्या ५ हजार रूपयांसह भारतात...

Nora Fatehi Struggle : नोरा फतेही अवघ्या ५ हजार रूपयांसह भारतात पळून आली होती, बॉलिवूड एंट्रीसाठी घरच्यांचा होता विरोध

Subscribe

नोरा फतेही ही बॉलिवूडची अशी एक डान्सर आहे जी तिच्या डान्समधून समोरच्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या डान्सचा दिवाना बनवते. डान्सचं वेडं नोराला लहानपणापासूनच होतं. शाळेत ती अनेकदा डान्सच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची

Nora Fatehi Struggle : नाच मेरी रानी म्हणत धमाकेदार डान्स करणारी अभिनेत्री मॉडेल नोरा फतेही आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. नोराला न ओळखणारे आता फार कमी लोक राहिले आहे. आपल्या मॉडेलिंग आणि अभिनयातून नोराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र इथ पर्यंत पोहोचण्याचा नोराचा प्रवास काही म्हणावा तसा सोप्प नव्हता. नोरा अभिनेत्री होणं हे तिच्या कुटुंबाला कधीच मान्य नव्हतं. कुटुंबाच्या विरोधात जाऊन नोराने मोठे पाऊल उचलले आणि आज ती सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कसा होता नोराचा स्ड्रग्लिंग काळ जाणून घ्या.

नोरा फतेही ही बॉलिवूडची अशी एक डान्सर आहे जी तिच्या डान्समधून समोरच्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या डान्सचा दिवाना बनवते. डान्सचं वेडं नोराला लहानपणापासूनच होतं. शाळेत ती अनेकदा डान्सच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची मात्र हे तिच्या आई वडिलांना कधीच आवडायचे नाही. नोराला पहिल्यापासून एक परफॉर्मर बनायचे होते. मात्र तिचे ते स्वप्न लहानपणी कधीच पूर्ण झाले नाही. नोरा घरात कधी कधी लपून छपून डान्स करायची. तेव्ह तिला चुकून कोणी पाहिले की तिला आई वडिलांचा मार बसायचा. तरीही नोराने लपून छपून तिचा डान्स सुरू ठेवलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -

नोराला डान्ससोबत अभिनयाचे वेड देखील होते. मात्र आपली मुलगी एका ग्लॅमर जगात जाणे तिच्या आई वडिलांनी कधीच मान्य केले नव्हते. नोराने जिद्द केली आणि केवळ ५ हजार रुपये घेऊन ती घरातून पळून काम शोधण्यासाठी थेट भारतात आली. कॅनडाहून आलेल्या नोराला भारतातील सिनेसृष्टीचे दरवाजे आपल्यासाठी उघडे असतील असे तिला वाटले मात्र प्रत्यक्षात भारतात आल्यानंतर तिला खरी परिस्थिती कळली आणि इथून सुरू झाला नोराचा खरा प्रवास.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -

नोराचा स्ट्रग्लिंग काळ अनेक वर्ष सुरू होता. नोराला एका चांगल्या संधीची गरज होती. आणि सत्यमेव जयते मधील दिलबर में या गाण्यात नोराला ब्रेक मिळाला आणि तिचे नशीबच उजळलं. तेव्हापासून आजपर्यंत नोराचा अवितर प्रवास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आलेले नाच मेरी रानी गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. केवळ हिंदी नाही तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील सिनेमांमध्ये देखील नोरा काम करते आहे.

 

 


हेही वाचा – Deep Sidhu : प्लिज तु परत ये ! दीप सिध्दूच्या मृत्यूने खचली…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -