घरताज्या घडामोडीcordelia cruise drug case : आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते, 'या' अहवालात काहीही...

cordelia cruise drug case : आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते, ‘या’ अहवालात काहीही तथ्य नाही, NCBचा SITवर पलटवार

Subscribe

आर्यन खानकडे कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज सापडले नव्हते असे एसआयटीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईवर यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या अहवालावर एनसीबीकडून प्रतिक्रिया आली आहे. एसआयटीच्या अहवालात कोणतेही तथ्य नाही. या अहवालाबाबत एनसीबीकडे उलटतपासणी करण्यात आली नाही असे एनसीबी डीडीजी संजय सिंह म्हणाले आहेत. दरम्यान एसआयटीच्या या अहवालावरुन पुन्हा एकदा संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत आर्यन खानसह १७ जणांना अटक केली होती. यामध्ये आर्यन खानचा मित्र अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली होती.

आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. यामुळे या प्रकरणाची चौकशी एसआयटी गठीत करुन करण्यात येत होती. एसआयटीच्या चौकशीचा अहवाल समोर आला असून यामध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित नसल्याचे त्याच्या चॅटवरुन स्पष्ट झाले असल्याचे अहवालात म्हटलं आहे. दरम्यान यात कोणतेही तथ्य नसल्याचे एनसीबीकडून म्हटलं आहे.

- Advertisement -

एनसीबीने एसआयटीच्या अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खानच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत हे अकाली आहे. सद्या तपास सुरुच असून अतापर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. एनआयटी प्रमुख आणि एनसीबी जीडी संजय सिंह यांनी कॉर्डेलिया क्रूझ छापेमारीत आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही यामध्ये काही तथ्य नाही. असा अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी कोणतीही उलटतपासणी करण्यात आली नाही. असेही एनसीबीने म्हटलं आहे.

एसआयटीच्या अहवालात काय म्हटलंय

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते, आर्यनचा फोन घेऊन त्याच्या चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन खान आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग होता. छापेमारीदरम्यान एनसीबीने छापेमारी करताना व्हिडीओ केला नाही. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत. आर्यन खानने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितले नाही. असेही तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. आर्यन खानने मोबाईलमध्ये गांजा आणि ड्रग्ज संबंधी चॅट केले असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु त्याने असे चॅट केले नाही. आर्यन खानने ड्रग्ज सेवन केले असेल तर त्याला काय शिक्षा होऊ शकते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

- Advertisement -

हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCBची खंडणीखोरी उघड, भाजपने जाहीर माफी मागावी- सचिन सावंत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -