घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी रुग्णांची नोंद तर...

Mumbai Corona Update : मुंबईत पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी रुग्णांची नोंद तर ,एक मृत्यू

Subscribe

नियम पाळूया आणि शून्याकडे वाटचाल करुया. करोनाला संपवू! असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.

 Mumbai Corona Update :  मुंबई कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिल्यांच मुंबईत ५० पेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मुंबईत इतक्या कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मागील २४ तासात एकूण ४६ बाधित रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.०१ टक्क्यांवर आला असून आजच्या रुग्णसंख्येने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. नियम पाळूया आणि शून्याकडे वाटचाल करुया. करोनाला संपवू! असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईत मागील १० – १२ दिवसांपासून एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता मुंबईचा मृत्यूदर हा शून्यावर येऊन ठेपला होता. परंतु आज मुंबईत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. मुंबईत आज एकूण २० हजार २०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील केवळ ४६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी फक्त ५ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेत. तर त्यातील केवळ एका रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज भासली आहे.

- Advertisement -

मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के असून मुंबईत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.०१ टक्के इतका आहे.

राज्यात आज ३६२ रुग्ण

तर राज्याचा विचार केला असता मागील २४ तासात राज्यात ३६२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा शून्यावर आला असून आज राज्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज राज्यात ६८८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात रुग्णसंख्येत घट, केवळ ३ जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -