घरताज्या घडामोडीVideo : वरुण धवनचा रश्मिका मंदाना सोबत Habibo गाण्यावर ढासू डान्स,...

Video : वरुण धवनचा रश्मिका मंदाना सोबत Habibo गाण्यावर ढासू डान्स, पाहा व्हिडीओ

Subscribe

रश्मिका मंदाना गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या पुष्पा या सुपरहिट सिनेमामुळे चर्चेत आहे. पुष्पाची श्रीवल्ली म्हणून रश्मिका चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. रश्मिकाचा वरुण धवन सोबतचा व्हिडिओ पाहून तिचे बॉलिवूड चाहते पुन्हा तिच्यावर फिदा झालेत.

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna)  लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्याआधी रश्मिका अभिनेता वरुण धवनसोबत (varun dhawan)  धम्माल डान्स करताना दिसली. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर थालापती विजयचा आगामी ‘बीस्ट’ सिनेमातील अरेबिक सॉग Arabic Kuthu HABIBO या गाण्यावर दोघांनी धम्माल डान्स केला आहे. वरुणने त्याच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केलाय.

रश्मिका मंदाना गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या पुष्पा या सुपरहिट सिनेमामुळे चर्चेत आहे. पुष्पाची श्रीवल्ली म्हणून रश्मिका चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. रश्मिकाचा वरुण धवन सोबतचा व्हिडिओ पाहून तिचे बॉलिवूड चाहते पुन्हा तिच्यावर फिदा झालेत. काही दिवसांपूर्वी वरुणने दोघांचा एक सेल्फी देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवरुन रश्मिका वरुण धवनसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि आता या व्हिडीओमुळे रश्मिकाच्या बॉलिवूड एंट्रीचा सस्पेंस आणखीच वाढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by My Mahanagar (@mymahanagarnews)

- Advertisement -

यो हबीबो… असे कॅप्शन देत वरुणने दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हबीबो हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. गाण्यात रश्मिकाने कलरफुल शॉर्ट स्कर्ट आणि रेट टॉपसह ब्लू डेनिम पेअर घातला आहे. तर वरुण धवनने ब्लॅक सनग्लासेस आणि ब्लॅक शर्ट आणि ब्राऊन पॅट घातल धम्माल डान्स केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisement -

या व्हिडीओआधी रश्मिकाने वरुणसह सेल्फी शेअर केला होता. ‘विथ हॅप्पी फेसेस’, असे कॅप्शन रश्मिकाने फोटोला दिले होते. तर वरुणचा एक कॅन्डिड फोटोही रश्मिकाने शेअर केला होता.


हेही वाचा – अक्षय कुमारने ‘बेवफा’ म्हणत कपिल शर्माला मारली मिठी, जुन्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -