घरदेश-विदेशPunjab Election Result 2022 : मोबाईल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडून चन्नींचा पराभव, अरविंद...

Punjab Election Result 2022 : मोबाईल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडून चन्नींचा पराभव, अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

Subscribe

कॅप्टन साहेब हरले, चन्नी साहेब हरले, नवज्योतसिंग सिद्धू हरले. ही मोठी क्रांती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपण व्यवस्था बदलली नाही, तर काहीही होणार नाही, असे भगतसिंग म्हणाले होते. पंजाबच्या जनतेने यावेळी व्यवस्था बदलली, 'आप'ने देशातील व्यवस्था बदलली. 'माझ्याविरोधात मोठे षडयंत्र रचले गेले.

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं मोठा विजय मिळवल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत पंजाबच्या नागरिकांचे आभार व्यक्त केलेत. आज बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण झाले. पंजाबच्या जनतेने यावेळी व्यवस्था बदलली, ‘आप’ने देशातील व्यवस्था बदलली, असंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणालेत.

कॅप्टन साहेब हरले, चन्नी साहेब हरले, नवज्योतसिंग सिद्धू हरले. ही मोठी क्रांती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपण व्यवस्था बदलली नाही, तर काहीही होणार नाही, असे भगतसिंग म्हणाले होते. पंजाबच्या जनतेने यावेळी व्यवस्था बदलली, ‘आप’ने देशातील व्यवस्था बदलली. ‘माझ्याविरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले. मात्र या निकालांमधून देशातील जनतेने केजरीवाल हे दहशतवादी नसून देशाचे सच्चे देशभक्त आणि पुत्र असल्याचे सिद्ध केल्याचं सांगितलंय. आज आपण नव्या भारताची शपथ घेऊ. नवीन भारत ज्यामध्ये द्वेष नसेल, माता-भगिनी सुरक्षित असतील, शिक्षण असेल. ‘आम्ही असा भारत बनवू, ज्यामध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालये असतील, जेणेकरून मुलांना युक्रेनला जावे लागणार नाही,’ असा टोलाही अरविंद केजरीवालांनी केंद्रातल्या मोदी सरकारला लगावलाय.

- Advertisement -

पंजाब विधानसभा निवडणुकीतील सर्व 117 जागांपैकी आम आदमी पक्षाने 91 जागांवर आघाडी घेतली, तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाला केवळ 19 जागांवर आघाडी मिळाली. अकाली दल+ फक्त चार, तर भाजप+ दोन जागा मिळाल्यात. पंजाबमधील 117 पैकी 69 जागांवर ‘आप’ने क्लीन स्वीप केला. ‘माझा’मध्येही आपचे वर्चस्व दिसून आले आणि दोआबामध्येही ते विरोधी पक्षांसाठी खडतर आव्हान ठरले. पंजाबमध्ये 53 वर्षांनंतर त्रिशंकू विधानसभा होण्याची राजकीय चिन्हे दिसत होती, मात्र जनतेने आम आदमी पार्टीला प्रत्येकाप्रमाणे स्पष्ट बहुमत दिले. आपच्या भगवंत मान यांना 82 हजार 23 मत मिळाली असून, काँग्रेसचे दलवीर सिंग गोल्डी यांना 24 हजार 306 मतांनी पराभव स्वीकारलाय. पंजाबमध्ये आपने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र निर्माण झालंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची प्रचंड बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.


हेही वाचाः UP Election Result 2022: योगींना हायकमांड देणार यूपीच्या विजयाचं गिफ्ट; बीजेपी संसदीय बोर्डाचे सदस्य होणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -