घरदेश-विदेशगुजरातच्या सचिवालयात घुसला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद

गुजरातच्या सचिवालयात घुसला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद

Subscribe

पोलीस आणि वन विभागाचे १०० अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याच्या शोधामध्ये सचिवालयामध्ये सर्च ऑपरेशन करत आहेत. सध्या या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नाही.

गुजरात विधानसभा सचिवालयामध्ये रविवारी रात्री एक बिबट्या घुसला आहे. वन विभाग आणि पोलीस बिबट्याला पकडण्यासाठी संयुक्त अभियान राबवत आहेत. सध्या सचिवालय बंद करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्यानुसार मध्यरात्री १ वाजून ५३ मिनिटांनी बिबट्या गुजरात विधासभा सचिवालयाच्या गेट क्रमांक ७ मधून घुसताना दिसत आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. पोलीस आणि वन विभागाचे १०० अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याच्या शोधामध्ये सचिवालयामध्ये सर्च ऑपरेशन करत आहेत. सध्या या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नाही.

- Advertisement -

इंद्रोजा जंगलातून बिबट्या आला

सचिवालय भवनाला सध्या बंद करण्यात आले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सचिवालयामध्ये जास्त वर्दळ असते. मात्र बिबट्याच्या भितीने आज सचिवालयातील कामकाज ठप्प झाले आहे. विधानसभेच्या बाहेर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे. असे सांगितले जात आहे की, हा बिबट्या इंद्रोजा भक्षाच्य शोधात आला असावा.

सचिवालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

सचिवालयात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशिवाय सर्व मंत्र्यांचे कार्यालय आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या घटनेनंतर याठिकाणी असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी विधानसभेतील सर्व मार्ग बंद केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी राबवले जात असलेले संयुक्त ऑपरेशन संपेपर्यंत कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -