घरताज्या घडामोडीThe Kashmir Files प्रमोट करण्यासाठी Kapil Sharma ने दिला नकार ? अनुपम...

The Kashmir Files प्रमोट करण्यासाठी Kapil Sharma ने दिला नकार ? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

Subscribe

कपिल शर्माने (The Kapil Sharma Show ) त्याच्या शो मध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्यास नकार दिलाय अशा आशयाच्या बातम्या समोर येत आहे.  या मुद्यावरुन प्रचंड कॉन्ट्रोवर्सी रंगली.  इतकंच काय तर कपील शर्माला बॉयकॉट करण्याची मागणी देखील होत आहे.

The Kashmir Files : द कश्मिर फाईल्स हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच नाही तर राजकारणमाध्येही चर्चेचा विषय बनला आहे. 11 मार्चला हा सिनेमा रिलीज झाला. कश्मिरी पंडीतांवर झालेले अत्याचार या सिनेमात मांडण्यात आलेत. दरम्यान गेल्या काही दिवसापासून अनेक हीट चित्रपट रिलीज झालेत मात्र या सर्वांना मागे टाकत द कश्मिर फाईल्साने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलीय. तर  मात्र दुसरीकडे बॉलिवूडमधील कोणत्याही बड्या दिग्दर्शकाने तसेच कलाकारांनी यावर भाष्य करन टाळलं आहे.

- Advertisement -

बॉलिवूडमधील  बिग स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show )  मध्ये येत असतात. परंतु द कश्मिर फाईल्सचे प्रमोशन काही कपिल शर्मामध्ये झाल्याचे पाहायला मिळाले नाही आणि याचमुळे या कपिल शर्मा शो चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. कपिल शर्माने त्याच्या शो मध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्यास नकार दिलाय अशा आशयाच्या बातम्या समोर येत आहे.  या मुद्यावरुन प्रचंड कॉन्ट्रोवर्सी रंगली.  इतकंच काय तर कपील शर्माला बॉयकॉट करण्याची मागणी देखील होत आहे. आता या संपूर्ण घडामोडीवर द कश्मिर फाईल्स या सिनेमात काम करणारे दिग्गद कलाकार अनुपम खेर यांनी भाष्य केलंय.

एका मुलाखती दरम्यान अनुपम खेर म्हणाले, ‘द कपिल शर्मा शो’ वर त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करू इच्छित नाही कारण हा एक गंभीर आशयाचा चित्रपट आहे आणि द कपिल शर्मा शो हा कॉमेडी शो आहे.

- Advertisement -

आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

अनुपम खेर पुढे सांगतात की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या टीमला दोन महिन्यांपूर्वीच शोमध्ये येण्यासाठी कपिलने आमंत्रण दिले होते. पण मी माझ्या मॅनेजर हरमनला सांगितले की, ‘हा चित्रपट अतिशय गंभीर विषयावर बनवला आहे, त्यामुळे मी शोमध्ये नाही जाऊ शकत.

The Kashmir File : विवेक अग्निहोत्रीला ‘ द कश्मीर फाईल’ सिनेमा बनवण्यासाठी लागले 4 वर्ष, फतवाही काढला होता

कपिलने अनुपम यांच्या मुलाखतीची क्लिप ट्विटरवर शेअर करत त्यांना धन्यवाद दिलेत. कपिलने म्हटलेय, “धन्यावाद पाजी अनुपम खेर. माझ्यावरील सर्व खोट्या आरोपांचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि त्या सर्व मित्रांचेही आभार ज्यांनी सत्य जाणून न घेता माझ्यावर इतके प्रेम दाखवलं,  मला समजून घेतलं. आनंदी राहा.


हेही वाचा – The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

हेही वाचा – The Kashmir Files : गोव्यासह ‘या’ राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -