घरअर्थजगत'एईएमएल' च्या 500 कर्मचाऱ्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

‘एईएमएल’ च्या 500 कर्मचाऱ्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

Subscribe

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ने अदाणी फाउंडेशन आणि मोहन फाऊंडेशनसह अवयव दानासारख्या महत्त्वाच्या विषयाची व्यापक स्तरावर जनजागृती करण्यासाठी जीवन अमृत – जीवनाची सर्वात सुंदर भेट’ हा उपक्रम सुरू केला आहे.

जीवन अमृत’ या जनजागृती विषयक मोहिमेद्वारे लोकांनाइतरांचे जीवन वाचवण्यासाठी त्यांचे अवयव दान करण्याची शपथ घेण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. स्पेनपोर्तुगालअमेरिका आणि इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात अवयवदानाचे प्रमाण नगण्य आहे. अवयव प्रत्यारोपण करता येण्याजोगे अवयवांचे दान करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढाकार घेतल्यास हे बदलू शकते.

- Advertisement -

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) च्या ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची शपथ मुंबईत घेतली. जीवन अमृत’ या मोहिमेचा शुभारंभ करताना, अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रिती अदाणी यांनीही यावेळी जीवनरक्षक प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली.

 “देशातील अल्प प्रमाणातील अवयव दानामुळे पाच लाख भारतीयांचा मृत्यू होतो. कारण अवयव उपलब्ध असले तरी ते प्रत्यारोपण करू शकत नाहीत“, असे अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रिती अदाणी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “हे एक कटू आणि निराशाजनक वास्तव आहे. कारण यामुळे अनावश्यक मृत्यू होतात. मला खात्री आहे कीसदैव दातृत्वाची आणि जनतेची काळजी घेण्याची गौरवशाली परंपरा असलेले राष्ट्र म्हणून आपण यापुढेही अधिक चांगले करू शकतो.

- Advertisement -

 अधिक जीव वाचवायचे असतील तर राष्ट्रीय स्तरावर लक्षणीय मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे”, असे नमूद करत डॉ. अदाणी म्हणाले की,“काही लोक अजूनही त्यांचे अवयव दान करण्यास संकोच करतात. हा संकोच सर्व प्रकारची भीती आणि गैरसमजांमुळे उद्भवतो. अवयवदानाबाबतच्या निराधार शंका आणि चिंता दूर करण्यासाठी आपल्याला आणखी काही करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोहन फाउंडेशनसारख्या संस्थांनी लोकांना त्यांचे अवयव देण्यासाठी शिक्षित तसेच प्रवृत्त करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे मला निश्चितच कैतुक आहे.

अवयव दानसारख्या क्षेत्रात अजूनही खूप काही करण्याची ससंधी आहे. भारत हा देश अवयवबाबतच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीच्या आव्हानाचा सामना करत आहे”, असे सुश्री पल्लवी कुमार यांनी निदर्शनास आणले. परिणामीअवयवाससाठी प्रतीक्षा यादीत असतानाच अनेकांचा मृत्यू मोहन फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक होतो. अदानी समूहाच्या पुढाकाराने घेण्यात आलेला याविषयीचा जीवनरक्षक उपक्रम सुरू करण्यासाठी अनेक राज्यांना मदत करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकाररुग्णालये तसेच आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था आणि अदानी फाऊंडेशनसारख्या संस्थांसारखे अनेक भागधारक एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) चे व्यवस्थापकीय संचालक  कंदर्प पटेल यांनी यावेळी नमूद केले की, “अदाणी इलेक्ट्रिसिटीमध्ये अशा एका उदात्त कार्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. मला नम्रपणे म्हणावेसे वाटते कीकंपनीतील माझे अनेक सहकारी यानिमित्ताने अवयव दान करण्याचे वचन पाळण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कंपनी दररोज ३० लाख ग्राहकांचे जीवनमान उंचावत असल्याने मला विश्वास आहे की अवयवदानाचा संदेश मुंबईभर मोठ्या प्रमाणावर पसरवू शकतो आणि बहुमोल जीव वाचवू शकतोअसा मला विश्वास आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -