घरताज्या घडामोडीVideo: बीरभूम हिंसेनंतर राज्यसभेत राष्ट्रपती राजवटची मागणी, भाजप महिला खासदारांना अश्रू अनावर

Video: बीरभूम हिंसेनंतर राज्यसभेत राष्ट्रपती राजवटची मागणी, भाजप महिला खासदारांना अश्रू अनावर

Subscribe

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील हिसेंच्या घटनेचे पडसाद आज, शुक्रवारी संसदेत उमटले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत या घटनेसंदर्भात गदारोळ झाला. भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनी राज्यसभेत या घटनेबाबतचा मुद्दा उचलून धरला. हिंसेवरून त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. यावेळी भाजप खासदार रुपा गांगुली यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटची मागणी करत असताना अश्रू अनावर झाले.

भाजप खासदार रुपा गांगुली म्हणाले की, ‘बीरभूम हिंसेत ८ जणांना मारले. जास्त लोकांचा मृत्यू झाल्याने काही फरक नाही पडत, परंतु लोकांना जाळून मारले जात आहे. बंगालच्या पोलिसांवर विश्वास नाहीये. राज्यात गेल्या ७ दिवसांत २६ राजकीय नेत्यांची हत्या झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे. बंगालमध्ये सामूहिक हत्या होत आहे. लोकं पळून जात आहेत. आता राज्य राहण्याच्या लायकीचे नाहीये. पश्चिम बंगालमध्ये लोकं बोलू शकत नाहीत. सरकार खूनींना वाचवत आहेत. असे दुसरे कोणते राज्य नाही, जिथे सरकार निवडणूक जिंकल्यानंतर लोकांना मारते. आम्ही माणूस आहे. आम्ही दगडाचे काळीज असलेले राजकारण करत नाही.’

- Advertisement -

दरम्यान काल, गुरुवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः या घटनेतील पीडित कुटुंबियांना जाऊ भेटल्या. त्यांनी सर्व पीडित कुटुंबियांसोबत बातचीत केली आणि त्यांचे सांत्वन केले. ममता बॅनर्जी बोलत असतात अनेक कुटुंबांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी ममता बॅनर्जी यांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाखांचा चेक दिला. तसेच आगीच्या घटनेत जळालेल्या लोकांच्या कुटुंबियांनी ५ लाखांची मदत केली. तर घरांच्या पुर्नबांधणीसाठी २ लाखांची मदत दिली.

- Advertisement -

हेही वाचा – West Bengal: बीरभूम हिंसेबाबत कोलकाता हायकोर्टाचे CBIला तपास करण्याचे आदेश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -