घरताज्या घडामोडीहिंदुत्वावरुन राज ठाकरेंचा मविआवर निशाणा, भाजप-मनसे युतीबाबत रावसाहेब दानवेंचे सूचक वक्तव्य

हिंदुत्वावरुन राज ठाकरेंचा मविआवर निशाणा, भाजप-मनसे युतीबाबत रावसाहेब दानवेंचे सूचक वक्तव्य

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महाविकास आघाडीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन घणाघात केला आहे. भाजपच्या भूमिकेसारखे राज ठाकरे यांनी भाषण केल्यामुळे मनसे-भाजप युती होणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. तर दुसऱ्याच दिवशी रविवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे युतीच्या चर्चांना वेग आला होता. परंतु भाजप-मनसे युती तेव्हाच शक्य होईल जेव्हा राज ठाकरे परप्रांतीयांचा मुद्दा सोडतील असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप-मनसे मधील युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. गुढी पाडवा मेळव्यात मनसेन हिंदुत्वाचा नारा धरला आहे. यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचे भाजप नेत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्याच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे आणि भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. यावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा सोडून आपल्या धोरणात बदल केला पाहिजे. जेव्हा परप्रांतीयांच्या धोरणात बदल करतील तोपर्यंत युती शक्य नाही असे दानवे म्हणाले. मुंबईतही मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा दानवेंनी केला आहे.

माझी राज ठाकरेंशी भेट होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी आपली भेट होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ही भेट राजकीय नसून वेगळ्या विषयावर होणार असल्याचे दानवे म्हणाले आहेत. दरम्यान आम्हाला वाटले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. आता मात्र घरातून आवाज उठायला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

यंत्रणांना घाबरण्याचे कारण काय?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन वक्तव्य केलं आहे. ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार केल्यावर त्या कारवाई करत असतात. त्यामुळे कोणावरही कारवाई लागू शकते. यामध्ये घाबरण्याचे कारण काय? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.


हेही वाचा : संजय राऊतांसारखा राष्ट्रवादीचा भोंगा असाच वाजत राहणार, नितेश राणेंची खोचक टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -