घरक्राइमअनेक अभिनेत्रींना फसवणाऱ्या तिहार तुरुंगातील आरोपी Sukesh Chandrasekhar ला ईडीकडून अटक

अनेक अभिनेत्रींना फसवणाऱ्या तिहार तुरुंगातील आरोपी Sukesh Chandrasekhar ला ईडीकडून अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्रींना फसवणारा मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ईडीने दुसऱ्या एका प्रकरणात अटक केली आहे. 2017 च्या निवडणूक आयोगाशी संबंधीत लाचखोरी प्रकरणी त्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तिहार तुरुंगातून अटक केली आहे. AIADMK नेते TTV दिनकरन यांच्याशी संबंधित 5 वर्षे जुने हे प्रकरण आहे.

2017 मध्ये तमिळनाडूमधील आरके नगर विधानसभा पोटनिवडणुकीत AIADMK चे नेते TTV दिनाकरण यांना ‘दोन फूलांची पाने’ असलेलं निवडणूक चिन्ह मिळवून देईल असे आरोपी सुकेशने सांगितले. यासाठी त्याने 50 कोटींची मागणी केली. दरम्यान निवडणूक आयोग (EC) अधिकाऱ्यांना या चिन्हासाठी 50 कोटी रुपयांची लाच दिली. दरम्यान दिनाकरन याने सुकेशला जवळपास दोन कोटी रुपये पावठले देखील. या गैरव्यवहारांची माहिती दिल्ली पोलिसांनी मिळाली. यावेळी निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने आरोपी दिनाकरन याला प्रकरणी आरोपी म्हणून अटक केली. कारण भारतात लाच घेणे आणि लाच देणे कायद्याने गुन्हा आहे. तर  दिल्ली पोलिसांनी चंद्रशेखरला याला अटक केली.

- Advertisement -

सुकेश चंद्रशेखरल याने गृह आणि कायदा मंत्रालयाचे अधिकारी म्हणून भासवत दिल्लीस्थित व्यावासायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. मात्र सुकेशने तुरुंगात असतानाही अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना करोडोंच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे ईडीला आढळून आलं आहे. सुकेशने भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूर या तीन अभिनेत्रींशी संपर्क साधला होता. मात्र आता टीटीव्ही दिनाकरन फसवणूक प्रकरणी ईडीने सुकेशला सात दिवसांची कोठडी दिली आहे.


शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात, ‘या’ नेत्याच्या दाव्यानं खळबळ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -