घररायगडपालीतील अवैध पार्किंग, दुकानदारांच्या अतिक्रमणावर कारवाई कधी?, पालीकरांचा नगरपंचायतीला सवाल

पालीतील अवैध पार्किंग, दुकानदारांच्या अतिक्रमणावर कारवाई कधी?, पालीकरांचा नगरपंचायतीला सवाल

Subscribe

अवैध पार्किंगच्या बातमीची पोलिस प्रशासनाकडून दखलही घेतली गेली नाही. पाली- खोपोली महामार्गावर गाड्या अडवून लायसन, कागदपत्रांची तपासणी करून कारवाई केली जाते. पण पाली शहरांमध्ये असणार्‍या अवैध पार्किंगबाबत कारवाई का केली जात नाही? असा सवाल पालीकरांना पडला आहे.

अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेले पाली शहर सुधागड तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे असल्याने येथे गर्दी असते. त्यामुळे शहरात अवैध पार्किंगची समस्या अधिक बिकट बनली आहे. वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक, पादचारींची गैरसोय होत आहे. हटाळेश्वर चौक ते गांधी चौकाकडे जाणार्‍या मार्गावर अवैध पार्किंग व रस्त्यालगत दुकानदारांचे अतिक्रमण वाढत जात आहेत. वाहनांना व पादचार्‍यांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा अवैध पार्किंग करणा-या व रस्त्यालगत अतिक्रमण करणार्‍या दुकानदारांवर कारवाई होणार तरी कधी? नगरपंचायत मात्र गांधारीसारखे डोळ्याला पट्टी बांधून बसली असल्याचे चित्र पालीत पहायला मिळते.

अनेकवेळा वर्तमानपत्रातून वारंवार बातम्याच्या माध्यमातून या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. आजतागायत या गंभीर समस्यांकडे पाली नगरपंचायतीने कोणतेही पाऊल उचलले नाही. येथील बाजारपेठ रस्ता, गांधी चौक रस्ता,जुना एसटी स्टँड परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी अवैधरित्या पार्किंग केली असतात. नो पार्किंगचा फलक काही ठिकाणी बसविण्यात आले असले तरी त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही ठिकाणी दुकान सोडून पुढेपुढे सरकत रस्त्यालगत दुकाने थाटून बसात आहेत. परिणामी इथून जाणार्‍या येणार्‍या वाहनांना, पादचार्‍यांना मार्ग काढताना अडचणी येतात आहेत. पाली ही सुधागड तालुक्यात मुख्य बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोक खरेदीसाठी पाली येथे येत असतात. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी येणार्‍या लोकांची मोठी गैरसोय होत आहे.

- Advertisement -

या आधी वारंवार अवैध पार्किंगच्या बातमीची पोलिस प्रशासनाकडून दखलही घेतली गेली नाही. पाली- खोपोली महामार्गावर गाड्या अडवून लायसन, कागदपत्रांची तपासणी करून कारवाई केली जाते. पण पाली शहरांमध्ये असणार्‍या अवैध पार्किंगबाबत कारवाई का केली जात नाही? असा सवाल पालीकरांना पडला आहे. या अवैध पार्किंग व रस्त्यालगत होणारे दुकानदारांचे अतिक्रमण वाढतच आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याला आळा घालावा अशी मागणी पालीकर जनतेतून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -