घरताज्या घडामोडीHanuman Chalisa: मनसेचा राजकीय कार्यक्रम, अन् मोहित कंबोजांचे मोफत भोंगेवाटप

Hanuman Chalisa: मनसेचा राजकीय कार्यक्रम, अन् मोहित कंबोजांचे मोफत भोंगेवाटप

Subscribe

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज राज ठाकरेंना पाठिंबा दिला आणि आता प्रत्यक्षात मंदिरांवर हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे वाटप करण्याची त्यांनी मोहिम राबवली आहे. यासाठी त्यांनी फोन नंबरही शेअर केला आहे.

ट्विटरवर काही दिवसांपासून मोहित कंबोज यांनी ट्वीट केले. त्यामधील फोटोमध्ये मोहित कंबोज बऱ्याच भोंग्यांसोबत दिसत आहेत. हे ट्विट करताना त्यांनी लिहिले की, ‘श्रीगुरु चरन सरोज रज निजमनु मुकुरु सुधारि। बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि।। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार। बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। जय श्री राम! जय श्री राम! जय श्री राम!’

- Advertisement -

मोफत भोंगा मिळवण्यासाठी कशाची गरज आहे, याबाबतची माहिती मोहित कंबोज यांनी ट्वीटद्वारे शेअर केली आहे. मोफत भोंगा मिळवण्यासाठी, मंदिराचे नाव, मोबाईलचे नाव, पत्ता, पंडित/ पुजाऱ्याचे नाव, अशा प्रकारची सर्व माहिती 9278412345 या नंबरवर पाठवायची आहे.

- Advertisement -

मोहित कंबोज यांनी काय भूमिका मांडली होती? 

‘मुंबईतील लोक आता दिवसातील पाच वेळा हनुमान चालीसा ऐकणार यासंदर्भात आम्ही राज ठाकरेंचे अभिनंदन करतो. ही मागणी मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत होती आणि या विषयाला राज ठाकरेंनी दुजोरा दिला. मुंबईतल्या मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर हे उतरवण्यात यावेत. तसेच, मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर कारवाई केली पाहिजे. देशातील इतर न्यायालयाने मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर उतरवण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी न्यायालयाचे आदेश लागू करा आणि तुम्ही सुरू केलेल्या ध्वनीप्रदुषणाविरोधातील मोहिमेअंतर्गत या मशिदींवरील लाऊडस्पिकर उतरवण्यात यावेत, अशी मागणी आहे,’ असे मोहित कंबोज यांनी म्हणाले होते.


हेही वाचा – Pune MNS : राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका वसंत मोरेंना भोवली, पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -