घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: रशियाबाबत भारतावर दबाव वाढवण्याच्या तयारीत अमेरिका; आज पंतप्रधान मोदींसोबत...

Russia Ukraine War: रशियाबाबत भारतावर दबाव वाढवण्याच्या तयारीत अमेरिका; आज पंतप्रधान मोदींसोबत बायडेन यांची बैठक

Subscribe

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यातील ही बैठक परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील अमेरिका-भारत 2+2 मंत्रीस्तरीय बैठकपूर्वी होईल.

युक्रेन आणि रशियामधील सुरू असलेल्या युद्धा (Russia-Ukraine War) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन (US President Joe Biden) यांच्यात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या या बैठकीदरम्यान जो बायडेन रशियासंबंधित कडक पाऊल उचलण्यासाठी भारतावर दबाव टाकू शकते. याबाबत व्हाईट हाऊसकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यामध्ये व्हर्च्युअल बैठक होणार आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन या गोष्टीवर जोर देतील की, युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याबाबत भारताने कडक पाऊले उचलावीत.’

रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत तटस्थ

अजून रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. या युद्धाबाबत भारताने सुरुवातीपासून तटस्थ भूमिका घेतली आहे. यामुळे अमेरिकेची चिंता सतत वाढत आहे. अमेरिकेने अनेकदा भारताला रशियाविरोधात कठोर भूमिका घेण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे रशियाने युद्धाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘भारताने संपूर्ण परिस्थिती सर्वसमावेशकपणे समजून घेतली आहे.’

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यातील बैठकीसंदर्भात जेन साकी म्हणाले की, ‘सरकार, अर्थव्यवस्था आणि लोकांमधील संबंध आणखीन मजूबत करण्यासाठी ही बैठक घेतली जात आहे.’ आज परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील अमेरिका-भारत 2+2 मंत्रीस्तरीय बैठक होईल.


हेही वाचा – कोरोना संपलेला नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -