घरमनोरंजनरुपाली चाकणकरांच्या मुलाची अभिनय क्षेत्रात एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

रुपाली चाकणकरांच्या मुलाची अभिनय क्षेत्रात एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Subscribe

रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहमचा नवा चित्रपट लवकरच येणार भेटीस

बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि राजकारण यांचा गेल्या कित्येक वर्षांपासून जवळचा संबंध आहे. आजवर अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला तर अनेक राजकारण्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. तर महाराष्ट्रात असेही काही कलाकार आहेत ज्यांचा कुटुंबाचा थेट राजकारणाशी संबंध आहे. यातील एक नाव म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचे वडील राजकारणात सक्रिय होते. तर त्याचा भाऊ देखील राजकारणात सक्रिय आहे. विशेष म्हणजे रितेशे देशमुखनंतर आता आणखी एका राजकीय नेत्यांचा मुलगा कलाविश्वात नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. . ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटात सोहम महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून त्याचा करियरमधील हा पहिला चित्रपट असेल. महिलांवरील अत्याचाराविरोधात कायम पाठीशी राहणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या मुलाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

- Advertisement -

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेण्यात आले आहे.

सोहम चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलताना असे म्हणाला की, अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला आमच्या चित्रपटाचे निर्माते सागर जैन यांनी दिली, आणि दिग्दर्शक कपिल सरांनी मला दिलेलं प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला आमच्या टीमने खूप सपोर्ट केल ज्यामुळे मला एकदाही मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव भासली नाही. मला कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरेच काही नव्याने शिकता आले, आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला, ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.

- Advertisement -

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू आहे याबाबत बोलताना त्या असे म्हणाल्या की, सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याच श्रेय आहे, माझा यात काहीच वाटा नाही उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले, माझ्यासाठी खरच अत्यंत आनंदाची बातमी आहे, आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो त्याचे नाव कमावेल.

या चित्रपटाची निर्मिती राजू तोड़साम, ऋषभ कोठारी व सागर जैन यांच्या जैन फिल्म प्रोडक्शन अंतर्गत होत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कपिल जोंधळे यांनी केले आहे. या चित्रपटातून सोहम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -