घरदेश-विदेशNew York Subway Shooting : अमेरिका बॉम्बस्फोटाने हादरली; न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर गोळीबार,...

New York Subway Shooting : अमेरिका बॉम्बस्फोटाने हादरली; न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर गोळीबार, 5 ठार

Subscribe

अमेरिका पुन्हा एका बॉम्ब स्फोटाने हादरली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ब्रूकलिन मेट्रो स्थानकावर मोठा बॉम्ब स्फोट झाला आहे. यावेळी गॅस मास्क परिधान केलेल्या दोन हल्लेखोरांनी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार केला तसेच मोठ्या स्फोटकांचा आवजही ऐकू आला आहे, या हल्ल्यात जवळपास 13 हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आत्तापर्यंत पाच जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

स्टेशनवर काही प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रवासी असल्याची विदारक दृष्ये समोर येत आहेत. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण न्यूयॉर्क शहरात हायअलर्ट जारी करण्यात आले. तसेच मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आली आहे. मात्र या बॉम्बस्फोट किती जण जखमी झाले किती मृत्यू झाले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने गोळीबार केला तो बांधकाम कामगारासारखा पोशाख परिधान करून आला होता. मात्र हा गोळीबार आहे की बॉम्ब हल्ल्याचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हा माणूस काही छोटे बॉम्ब घेऊन स्टेशनमध्ये घुसला होता. त्याच्या हातात बंदूकही होती. दरम्यान या घटनेनंतर आता संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनच्या उपनगरी भागातील लोक नेहमीप्रमाणे लोकल सबवे स्टेशनवर पोहोचत होते. येथून हे लोक शहराच्या इतर अनेक भागात पोहोचतात. त्यासाठी मेट्रो स्थानकावर ट्यूब एरिया आहे. येथून तीन वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो ट्रेन धावतात. सकाळी 8.30 च्या सुमारास (अमेरिकेच्या वेळेनुसार) अचानक स्फोट झाला आणि काही सेकंदांनी गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर गदारोळ झाला. काही मिनिटांनंतर धूर ओसरला आणि अनेक लोक फलाटावर पडताना दिसले तर अनेकांच्या शरीरातून रक्त वाहताना दिसले.

- Advertisement -

या घटनेनंतर लगेचच या स्थानकावरील सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. ट्रेन जिथे होती तिथेच थांबवण्यात आली. न्यूयॉर्क पोलिसांच्या कमांडो पथकाने स्टेशनचा ताबा घेतला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले- प्रथम आम्ही बॉम्बस्फोटासारखा आवाज ऐकला. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लोकांनी तेथे लपण्याची जागा शोधली, मात्र गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत.


Raj Thackeray live : राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ दोन मागण्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -