घरठाणेठाणे शहरात " किलीट तोमय्या गायब" झाल्याचे बॅनर

ठाणे शहरात ” किलीट तोमय्या गायब” झाल्याचे बॅनर

Subscribe

एकच चर्चा सध्या ठाण्यात सुरू

ठाणे शहरात एक नाहीतर तब्बल दहा ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या गायब झाल्याचे बॅनर भाजप नेत्यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर लावण्यात आले. त्या बॅनरवर कुठे गायब झाले किलीट तोमय्या, त्यांचे छायाचित्र जेलमध्ये असलेले लावून आपण यांना पाहिलंत का? असे म्हटले आहे. हे बॅनर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच चर्चा सध्या ठाण्यात सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार गायब असल्याचे बॅनर ओवळा माजीवडा परिसरात ठीकठिकाणी लावण्यात आले होते. यामागे भाजपचाच अप्रत्यक्षपणे हात असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मागे आयएनएस विक्रांत प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अटक पूर्व जामीनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला होता. त्यांचा अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला. परंतु सध्या ते गायब झाल्याने त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली जात आहे.

- Advertisement -

अशातच आता ठाणे शहरातील भाजप नेत्यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर किरीट यांचा फोटो असून पुढे जेलच्या सळया दिसत आहेत. तसेच या बॅनरवर कुठे गायब झाले किलीट तोमय्या आपण यांना पाहिलत का? असा आशय देखील टाकण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी तर हे बॅनर लावले गेले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे हे बॅनर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याच समर्थकांनी लावल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -