घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी : पोलिसांची व्हॅन पलटी, १० जखमी, १ जण गंभीर

इगतपुरी : पोलिसांची व्हॅन पलटी, १० जखमी, १ जण गंभीर

Subscribe

माणिकखांब जवळ झाला अपघात, व्हॅनने मारल्या ३-४ पलट्या

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब जवळ दोन वेगवेगळे अपघात झाले असून ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले. पहिल्या अपघातातील ट्रक काढतांना हा अपघात झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी (दि.१६) २ अपघात झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिकखांब जवळील वळणावर झाला. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांच्या व्हॉनला अपघात झाला असून ही पोलीस व्हॅन इगतपुरी येथे बंदोबस्तासाठी जात होती. या अपघातात एक पोलीस गंभीर तर दहा पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिला अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिकखांब शिवारात वळणावर झाला.

- Advertisement -

हिरव्या मिरचीने भरलेला ट्रकच्या (जीजे २७-टीटी ८६८५) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडर तोडून मध्यभागी उलटला. हा ट्रक काढत असतांना ग्रामीण पोलिसांचे वाहन अपघातग्रस्त झाले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिली. यावेळी मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक एका लेनने संथगतीने सुरू होती. अपघाताची माहिती समजताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

जखमी पोलीस कर्मचारी

- Advertisement -

1) सपोउनी चंदर पांडुरंग घागरे, वय 58, पोलीस मुख्यालय ना.ग्रा.
2) सपोउनी संजय विष्णुपवार, वय 56, रा. कामठवाडा नाशिक
3) पोहवा 1120 पंढटीनाथ धोंडु झनकट, वय 52, कोणार्कनगर, आडगाव, नाशिक
4) पोहवा 152 योगराज जगन्नाथ पाटील, वय 50, गजानन नगर, जेलरोड नाशिक
5) पोहवा 2000 संजय पोपट बोंबले, वय 50 रा. प्रभातनगर, म्हसरूळ, नाशिक
6) पोहवा 1353 सुनिल भाऊसाहेब देशमुख, वय 40, टा. प्रभातनगट, आडगाव नाशिक
7) पोहवा 1052 विष्णु धर्मा ठाकरे, वय 49, टा. मखमलाबाद, नाशिक
8) पोहवा 2399 चंद्रकांत तानाजी बच्छाव, वय 52, ठा. जत्रा हॉटेल जवळ नाशिक
9) पोहवा 2238 आशिफ उमर शेख, वय 56, टा. तुळशी आय हॉस्पीटल जवळ नाशिक
10) पोना 2516 देविदास नथु पाटील, वय 55, टा. कखमिनी नगर, नाशिकरोड
1) पोना 774 मनोहर पांडुरंग गावीत, वय 46, टा. जुने पोलीस मुख्यालय नाशिक
12) पोहवा दिंगबर देवजी शिंदे, टा. जुने पोलीस मुख्यालय ना.ग्रा

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -