घरक्रीडाखासदारकीचा सगळा पगार शेतकऱ्यांच्या लेकींच्या शिक्षणासाठी देणार, हरभजन सिंहची घोषणा

खासदारकीचा सगळा पगार शेतकऱ्यांच्या लेकींच्या शिक्षणासाठी देणार, हरभजन सिंहची घोषणा

Subscribe

भारताचा माजी फिरकीपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

भारताचा माजी फिरकीपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे. हरभजन सिंह याने केली आहे. हरभजन सिंहने याबाबत ट्विट करत माहिती दिली. हरभजनच्या या निर्णयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. नुकतंच हरभजनने खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर कामकाज सुरु केल्यानंतर हरभजन सिंह याने मोठा निर्णय घेतला. “एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे. देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.”, असं हरभजनने म्हटलं.

- Advertisement -

हरभजन सिंह नुकताच आप पक्षाकडून राज्यसभा खासदार झाला. आपनं या जागांवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, पंजाबचे आपचे सह-प्रभारी राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड केली होती.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचीही भेट घेतली पण नंतर हरभजन सिंग आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – Danish Open 2022 : आर. माधवनचा मुलगा वेदांतची मोलाची कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्य पदक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -