घरअर्थजगतUnemployment Allowance: पदवी मिळूनही नोकरी नाही, मग सरकार देणार 7500 रुपये बेरोजगारी...

Unemployment Allowance: पदवी मिळूनही नोकरी नाही, मग सरकार देणार 7500 रुपये बेरोजगारी भत्ता, पण कसा?

Subscribe

ज्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय पण तरीही त्यांना नोकरी नाही, अशा लोकांना केजरीवाल सरकार बेरोजगारी भत्ता देणार आहे. ज्या तरुणांना पदवी घेतली आहे, पण त्यांना नोकरी नाही, त्यांना सरकार महिना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता देणार आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं संक्रमण सुरू झाल्यानंतर बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच सरकार बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता देणार आहे. दिल्लीतील बेरोजगार तरुणांना केजरीवाल सरकार बेरोजगारी भत्ता देणार आहे.

ज्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय पण तरीही त्यांना नोकरी नाही, अशा लोकांना केजरीवाल सरकार बेरोजगारी भत्ता देणार आहे. ज्या तरुणांनी पदवी घेतली आहे, पण त्यांना नोकरी नाही, त्यांना सरकार महिना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता देणार आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट (PG) बेरोजगार तरुणांना 7500 रुपये महिना बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे.

- Advertisement -

या तरुणांना मिळणार भत्त्याचा फायदा

दिल्ली सरकारने ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट होण्याबरोबरच पात्रता आणि अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार अशा तरुणांना हा बेरोजगार भत्ता मिळणार आहे, ज्यांनी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये आपली नोंदणी केली आहे. प्रत्येक राज्यात एम्प्लॉयमेंट एक्सचेंज उघडण्यात आलं आहे, त्यात राज्यात किती जण बेरोजगार आहे, याची माहिती सरकारला मिळते.

या डॉक्युमेंटची लागणार आवश्यकता

योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
त्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता असेल
आधार कार्ड
पॅन कार्ड
निवास प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
कॉलेज आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो

- Advertisement -

योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज

दिल्ली सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल https://jobs.delhi.gov.in/ आहे.
त्यावर क्लिक करा आणि Job Seeker चा पर्याय निवडा.
पुढे एक नोंदणी पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल.
अर्जाचे सर्व तपशील जसे की शिक्षण आणि पदवीचे तपशील भरावे लागतील.
मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
शेवटी कॅप्चा कोड टाकून सबमिट करा
अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.


हेही वाचाः वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या का?; फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -