घरदेश-विदेशIAS Shah Faesal : काश्मीरची कैफियत मांडणारे UPSC टॉपर शाह फैसल पुन्हा...

IAS Shah Faesal : काश्मीरची कैफियत मांडणारे UPSC टॉपर शाह फैसल पुन्हा सेवेत

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC EXAM) 2010 साली टॉपर असलेले जम्मू काश्मीरचे शाह फैसल यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र जानेवारी 2019 मध्ये राजीनामा दिल्यानंतर शाह फैसल आता पुन्हा प्रशासकीय सेवेच रुजू झाले आहेत. फैसल यांनी तीन वर्षांपूर्वी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता, मात्र केंद्र सरकारने तो नाकारला अखेर त्यानंतर फैसल यांनी पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आलेय.

शाह फैसल यांची एवढी चर्चा का?

- Advertisement -

फैसल हे 2009 बॅचचे यूपीएससी परीक्षेत अव्वल येणारे पहिले काश्मिरी युवक होते. त्यांनी 2009 साली सिव्हिल सर्व्हिस एक्साम (Civil Service Exam) मध्ये टॉप केले. तेव्हापासून ते अनेकांसाठी चर्चेचा चेहरा होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही फैसल यांचे कौतुक केले होते, शाह फैसल यांना काश्मीरचे युथ आयकॉन म्हटले जाते. फैसल UPSC टॉप आल्यानंतर तरुणाईला त्यांच्याकडून अनेक आशा होत्या. मात्र अचानक जानेवारी 2019 मध्ये आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. राजीनामा देत त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीला राजकारणी नेते जबाबदार असल्याचे म्हटले. त्यांच्या राजीनाम्याने विशेषत; काश्मीरी युवकांना धक्का बसला. मात्र दहा वर्षानंतर का होईना त्यांनी प्रशासनात पुन्हा येण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना दिलासा देणारा आहे.

मात्र राजीनाम्यानंतर त्यांनी 2019 मध्येच प्रादेशिक राजकीय पक्ष ‘जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेट’ (jammu and kashmir peoples movemnent) पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर जम्मू काश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांनी देखील पुन्हा विचार करण्याचे आवाहन केले, मात्र ते न थांबता राजकारणात नशीब आजमवण्यासाठीग गेले, आयएएस होण्याआधी शाह फैसल हे डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि अव्वल क्रमांक पटकावला.

- Advertisement -

मात्र अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्त्यामुळे शाह फैसल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फैसल यांनी भारतात सतत होणाऱ्या बलात्काराच्या घटनेवर एक वादग्रस्त ट्विट करत भारताचा उल्लेख रेपिस्तान असा केला होता. या वक्तव्याप्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

दरम्यान शाह फैसल यांनी सेवेत पुन्हा येण्याआधी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘गेल्या आठ महिन्यांत (जानेवारी 2019-ऑगस्ट 2019) मी खचून गेलो आहे, बर्‍याच वर्षांच्या कठोर मेहनतीतून तयार केलेले जवळजवळ सर्व काही मी गमावलेय. मग ती नोकरी असो, मित्र असो किंवा प्रतिष्ठा असो. माझ्या आदर्शवादाने मला निराश केले आहे, पण मी आशा सोडलेली नाही.

मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारु शकतोय. आयुष्य मला आणखी एक संधी नक्कीच देईल. मला मागील 8 महिने पूर्णपणे मिटवायचे आहेत. अपयश आपल्याला आणखी मजबूत बनवतात. मी आज 39 वर्षांचा झालो आहे आणि मी नवीन सुरुवात करण्यास उत्सुक आहे .यांच्या या ट्विटवर आता अनेकांकडून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. तसेच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.


चोराच्या उलट्या बोंबा, महाराष्ट्राकडून 11 हजार कोटी येणं बाकी, डॉ. भागवत कराडांचा पलटवार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -