घरमहाराष्ट्र'घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्या, आमचे काही म्हणणे नाही'

‘घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्या, आमचे काही म्हणणे नाही’

Subscribe

महाराष्ट्रातील जनतेने जातीय सलोखा राखण्यासाठी कोणाच्याही दबावाला किंवा भावनिक आवाहनाला बळी पडू नये. भोंग्यांना परवानगी घेतली नाही तर कठोर भूमिका घेतली जाईल. ही परवानगी दोन दिवसात मिळणार नाही, याची मलाही कल्पना आहे. मात्र कायदा हातात घेण्याचं धाडस करू नये, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सर्व धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. सुप्रीम कोर्टाने घातलेल्या आवाजाच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये , असे आवाहन उजित पवार यांनी केले.

कोणीही अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही. अल्टिमेटम द्यायला ही काय हुकूमशाही नाही.तुम्हाला अल्टिमेटम द्यायचाच असेल तर घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना द्या, त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. मात्र जाहीरपणे कोणी असे वक्तव्य करत असेल तर नियम सगळ्यांना सारखे आहेत, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेने जातीय सलोखा राखण्यासाठी कोणाच्याही दबावाला किंवा भावनिक आवाहनाला बळी पडू नये. भोंग्यांना परवानगी घेतली नाही तर कठोर भूमिका घेतली जाईल. ही परवानगी दोन दिवसात मिळणार नाही, याची मलाही कल्पना आहे. मात्र कायदा हातात घेण्याचं धाडस करू नये, असा इशारा अजित पवार यांनी दिला. दरम्यान, भोंग्यांबाबत एखादा निर्णय घेतला तर तो सर्वच धार्मिक स्थळांसाठी लागू होईल. भोंग्यांबाबत निर्णय घेतला तर तो सर्वांसाठीच घ्यावा लागेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -