घरमुंबईराष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

Subscribe

विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई – रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचा कारभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी यांची नियुक्तीही फौजिया खान यांनी जाहीर केली.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेत फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले. तर विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन, असे त्या म्हणाल्या.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -