घरपालघरओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यातील संघर्ष समिती आयोगाला निवेदन देणार

ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यातील संघर्ष समिती आयोगाला निवेदन देणार

Subscribe

नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. समर्पित आयोगाने कोकण विभागासाठी २५ मेची तारिख निर्धारित केली असून पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीकडून जिल्ह्यातील ओबीसींना पालघर शिक्षक पतपेढी भवन येथे २० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपली निवेदने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील यांनी जिल्ह्यातील ओबीसींसाठी एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी) आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करण्यार्‍या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावी. तसेच निवेदन देता यावीत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापुर्वी करावी, असे पाटील यांच्या वतीने पत्रात करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -