घरदेश-विदेशकेअरटेकरचा जीव वाचवण्यासाठी हत्तीने घेतली धाव; व्हिडीओ होतोय व्हायरल

केअरटेकरचा जीव वाचवण्यासाठी हत्तीने घेतली धाव; व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

हत्तीला पाहण्यासाठी अनेकांचे डोळे आतुरलेले असतात. पण तो समोर आला की, त्याचे अवाढ्य रूप बघून जवळ जाण्यास भिती वाटते. पण जगात अशीही काही माणसं आहेत. जे आपल्या मुलांप्रमाणे हत्तीचे संगोपन करतात. त्याची नियमीत काळजी घेतात.

हत्तीला पाहण्यासाठी अनेकांचे डोळे आतुरलेले असतात. पण तो समोर आला की, त्याचे अवाढ्य रूप बघून जवळ जाण्यास भिती वाटते. पण जगात अशीही काही माणसं आहेत. जे आपल्या मुलांप्रमाणे हत्तीचे संगोपन करतात. त्याची नियमीत काळजी घेतात. त्यामुळे हत्ती आणि केअरटेकरमधील मैत्रीही घट्ट होते. कोणत्याही कठीण परिस्थितीत एकमेकांची साथ सोडत नाहीत. अशाच हत्ती आणि केअरटेकरच्या घट्ट मैत्रीचा व्हिडीओ सध्या शेअर मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीपासून केअरटेकरचा जीव वाचवण्यासाठी हत्ती धाव घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pubity (@pubity)

हत्ती आणि केअरटेकरच्या घट्ट मैत्रीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर pubity नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती आणि हत्तीच्या केअरटेकरचा त्याच्यासमोर केअरटेकरला मारण्याची अॅक्टिंग करण्याबद्दलचा प्लॅन सुरू असल्याचे दिसतंय. ठरल्याप्रमाणे हत्तीसमोर तो केअरटेकरला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी केअरटेकरला मारहाण करण्याचे हत्ती पाहतो आणि आपल्या केअरटेकरला वाचवण्यासाठी पळू लागतो. हत्तीला इतक्या आक्रमकतेने येताना पाहून केअरटेकरला मारणारा व्यक्ती तिथून घाबरून पळून जातो.

- Advertisement -

दरम्यान, हत्ती आणि केअरटेकरचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल. तसेच, प्राण्यांना जीव लावल्यास तेही आपल्याला समान वागणूक देतात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळेल.

इन्स्टाग्रामवर pubity नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओला पाहिला आहे. तर अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नाश्तासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी क्रिस्पी सोया कटलेट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -