घरताज्या घडामोडीअतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी स्वीकारला पदभार

अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी स्वीकारला पदभार

Subscribe

मुंबई महापालिकेतील (BMC) अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत सुरेश काकाणी (Suresh Kakani) हे नियत वयोमानानुसार नुकतेच निवृत्त झाले. त्यानंतर तब्बल २२ दिवसांनी त्यांच्या जागेवर शासन आदेशाने आशिष शर्मा (Ashish Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतील (BMC) अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत सुरेश काकाणी (Suresh Kakani) हे नियत वयोमानानुसार नुकतेच निवृत्त झाले. त्यानंतर तब्बल २२ दिवसांनी त्यांच्या जागेवर शासन आदेशाने आशिष शर्मा (Ashish Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईत कालपर्यंत कोविड रुग्णांची संख्या कमी होती. मात्र कोविडबाबतच्या नवीन अहवालानुसार मुंबईत कोविड रुग्णांची संख्या ३५० वर गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत कोविड (Mumbai Corona) अमिबासारखा पसरू लागला असल्याने पालिका आरोग्य यंत्रणेला याची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांना कोविडचे आव्हान स्वीकारून व त्यावर मात करीत मुंबईतील विकासकामे मार्गी लावावी लागतील. तसेच, आपल्या कामाने व कौशल्याने मुंबईकरांवर एक वेगळी छाप पाडावी लागणार आहे.

यापूर्वी, शर्मा हे दिल्लीत केंद्र सरकारमध्ये (Central Government) महाराष्ट्रकडून प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मात्र सुरेश काकाणी हे काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता आशिष शर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत यांनी नवीन अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांचे स्वागत केले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई महापालिका निवडणूक सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

शर्मा हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आय. आय. टी. दिल्लीमधून बी. टेक. पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस (पंजाब विद्यापीठ, चंदीगड) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तर प्रशासकीय सेवेत आल्यानंतर एम.एस्सी इन पब्लिक पॉलिसी ऍण्ड ऍडमिनिस्ट्रेशन ही पदव्युत्तर पदवी देखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (युनायटेड किंग्डम) मधून २००६-२००७ मध्ये संपादीत केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी, निवडणूक आयोगाचे आणखी एक पाऊल

शर्मा यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिमचे जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, केंद्रीय अपारंपरिक उर्जा मंत्र्यांचे खासगी सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर त्यांनी कामकाज केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य सचिव (वित्त), कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचे सहसचिव या पदांवर सेवा बजावली आहे.

केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन महाराष्ट्र राज्य शासनाकडे आशिष शर्मा हे रुजू झाल्यानंतर प्रधान सचिव श्रेणीमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे.


हेही वाचा – सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात करीन, आजची चौकशी रिसॉर्टबाबत – अनिल परब 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -