घरदेश-विदेशकुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामी करणं IAS संजीव खिरवारांच्या अंगलट! लडाखमध्ये झाली बदली

कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामी करणं IAS संजीव खिरवारांच्या अंगलट! लडाखमध्ये झाली बदली

Subscribe

IAS अधिकारी संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत, ते दिल्लीत महसूल आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत होते.

दिल्लीच्या (Delhi) त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्यासाठी अख्ख स्टेडियम रिकामी करणं IAS संजीव खिरवार (lAS Sanjay Khirwar) यांच्या चांगलचं अंगाशी आलं आहे. या प्रकरणी IAS संजीव खिरवार यांच्यासह त्यांच्या पत्नीचीही गुरुवारी संध्याकाळी बदली करण्यात आली आहे. आयएएस खिरवार यांती बदली लडाखमध्ये तर पत्नी रिंकू धुग्गा (Chief Secretary Rinku Dhugga) यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी मुख्य सचिवांनी एक अहवाल गृह मंत्रालयाला दिला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे माहिती समोर येतेय.

याप्रकरणी संबंधीत स्टेडियममधील कोच यांनी दावा केला की, पूर्वी रात्री ते 8 ते 8.30 वाजेपर्यंत सराव करत होते. मात्र आता त्यांना 7 वाजता स्टेडियम रिकामा करण्यास सांगितले आहे, जेणेकरुन IAS अधिकारी त्यांच्या कुत्र्यांसह येथे फेरफटका मारू शकतील, यामुळे त्यांच्या प्रशिक्षण आणि सरावात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

किरण बेदींना उपस्थित केला सवाल (lAS Sanjay Khirwar)

किरण बेदी यांनी आयएएस संजीव खिरवार यांच्या बदलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, जर आयएएस स्टेडियममध्ये कुत्रा फिरत असल्याची घटना खरी आहे, तर मग त्याची दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशात का पाठवले जात? निकाल लागेपर्यंत त्याला रजेवर का पाठवले जात नाही? असा सवाल उपस्थित करत भारतीय नागरी सेवेतील पदे गंभीर लोकांसाठी असे स्पष्ट मत व्यक्त केले.

- Advertisement -

मात्र 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. यावर स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, ते कधीकधी स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरायला घेऊन जातात, परंतु त्यांनी ऍथलीट्सच्या सरावात अडथळा आणल्याचे नाकारले आहे.

दिल्ली सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या त्यागराज स्टेडियम (Thyagraj Stadium) 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होते. यावर एका वृत्त वाहिनीशी बोलताना, स्टेडियमचे प्रशासक अजित चौधरी म्हणाले की, स्टेडियमची वेळ आधी 4-6 वाजेपर्यंत होती. त्यानंतर उन्हाचा वाढता प्रकोप पाहता ही वेळ सात वाजेपर्यंत करण्यात आली.

अजित चौधरी यांनी असेही म्हटले होते की, कोणतरी आयएएस अधिकारी 7 वाजल्यानंतर स्टेडियममध्ये येतात, दरम्यान मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारासही अधिकारी खिरवार आपल्या कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये दिसले. यावेळी त्यांचा कुत्रा रेसिंग ट्रॅक, फुटबॉल मैदानावर फिरताना दिसला, त्याला सुरक्षा रक्षकांनीही रोखले नाही.

कोण आहेत IAS संजीव खिरवार?

IAS अधिकारी संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत, ते दिल्लीत महसूल आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत होते. दिल्लीचे सर्व डीएम त्यांच्या हाताखाली काम करायचे. याशिवाय ते दिल्लीच्या पर्यावरण विभागाचे सचिवही होते. खिरवार यांनी बी-टेक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. त्यांनी चंदीगडमध्ये एसडीएम म्हणून करिअरला सुरुवात केली.


देहविक्री बेकायदेशीर नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -