घरटेक-वेकहरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी Instagram करणार मदत; नवं फिचर AMBER देणार अलर्ट

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी Instagram करणार मदत; नवं फिचर AMBER देणार अलर्ट

Subscribe

AMBER alerts काही खास परिसरातील इन्स्टाग्राम यूज करणाऱ्यांना अॅटिव्हेट करतो.

सध्याची तरुणाई Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप अॅटिव्ह असते. मात्र हेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता हरवलेल्या लहान मुलांना  शोधण्यासाठी मदत करणार आहे. (Find Missing Children) Meta ने आठवड्याच्या सुरुवातीलाच Instagram आपलं नवं फिचर AMBER लाँच करणार असल्याचे सांगितले होते. या फिचरच्या माध्यमातून आपल्या परिसरातून हरवलेल्या मुलांची माहिती नोटिफिकेशन मेसेजच्या माध्यमातून युजर्सपर्यंत पोहचणार आहे. (Instagram users)

META ने दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर 25 देशांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. मात्र येत्या काळात लवकरचं जगभरातील अनेक देशांमध्ये याचा विस्तार वाढवला जाईल, फेसबुक गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरवर काम करत होते. META चा दावा आहे की, 2015 मध्ये फेसबुकवर हे फिचर सुरु होताच आत्तापर्यंत शेकडो हरवलेल्या मुलांचा शोध घेता आला, META ने इन्स्टाग्रामसाठी सुरु केलेला AMBER alerts अनेक संघटनांच्या मदतीने बनवण्यात आला आहे. यात अमेरिकेच्या National Center for Missing & Exploited Children (NCMEC) आणि International Centre for Missing & Exploited Children सारख्या संघटनांचा समावेश आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे हरवलेल्या मुलांचा घेतला जाणार शोध

इन्स्टाग्रामने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, जेवढ्या जास्त लोकांमध्ये हरवलेल्या मुलांची माहिती पोहचते त्यावरून या मुलांना शोधणे सोप्पे जाते. यात सुरुवातीचे काही तास खूप महत्त्वाचे असतात. कारण या तासांत त्या मुलांपर्यंत लवकर पोहचले जाऊ शकते. यात कायदेशीर यंत्रणा AMBER alerts वर जेव्हा हरवलेल्या मुलांची माहिती देतात. तेव्हा संबंधित परिसरातील इन्स्टाग्राम युजर्सला एक नोटिफिकेशन जाते. ज्यात हरवलेल्या मुलांची सविस्तर माहिती असते.

कसे काम करत AMBER alerts फिचर

AMBER alerts काही खास परिसरातील इन्स्टाग्राम यूज करणाऱ्यांना अॅटिव्हेट करतो. ज्यातून त्या युजर्संना आपल्या परिसरातील हरवलेल्या मुलाच्या माहितीचा मेसेज पोहोचतो. जेणेकरून तपास लवकर करता येईल, हे फिचर युजर्सच्या प्रोफाईलवर लिहिलेल्या शहराची माहिती घेत हा मेसेज पाठवणार आहे. यासाठी आयपी एड्रेस आणि लोकेशन सर्विस यांसारख्या टेकनिकची मदत घेतली जाणार आहे.

- Advertisement -

युजर्सला मिळणाऱ्या मेसेजमध्ये संबंधित हरवलेल्या मुलाचा फोटो, त्याची सविस्तर माहिती, ज्या ठिकाणाहून हरवला त्या ठिकाणाची माहिती आणि इतर माहिती दिली जाणार आहे. युजर्स तो मेसेज आपल्या मित्र परिवाराला फॉरवर्ड करु शकतात. जेणेकरून त्या मुलाचा शोध लवकर घेता येऊ शकतो.

META ने दोन देशांमध्ये AMBER alerts फिचर लागू केले आहे. मात्र यात भारताचा समावेश नाही. सध्या अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, बुल्गेरिया, कॅनडा, एक्वाडोर, ग्रीस, ग्वाटेमाला, आयरलँड, जमॅका, कोरिया, लिथुआनिया, लग्जमबर्ग, मलेशिया, माल्टा, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलँड, रोमानिया, दक्षिण आफ्रिका, ताइवान, युक्रेन, युके, युनायटेड अरब आमिरात आणि अमेरिकेत हे फिचर लागू केले आहे.


तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत? या प्रकारे लगेच जाणून घ्या, नाहीतर होईल डोक्याला ताप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -