घरताज्या घडामोडीज्ञानवापीमध्ये पूजा करण्यासाठी गेलेल्या स्वामींना ठेवले नजरकैदेत

ज्ञानवापीमध्ये पूजा करण्यासाठी गेलेल्या स्वामींना ठेवले नजरकैदेत

Subscribe

आरती करण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाहीत असा इशारा स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी दिला आहे.

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid) सापडलेल्या शिवलिंगची पूजा करण्यासाठी काही संत तेथे पोहोचले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पूजा करण्यास नकार दिला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता स्वामी अभिमुक्तेश्वरानंद (Swami Abhimukteshwarananda) यांना नजरकैदेत ठेवले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या ठिकाणी पूजा करण्याची परवनागी देण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे.

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद (Swami Abhimukteshwarananda) यांनी आश्रमाच्या गेटवर धरणे आंदोलन पुकारले. जोवर आरती करण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, असा इशारा स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी दिला आहे. तसेच, ज्ञानवापी शिवलिंगची पूजा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले.

- Advertisement -

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, “मी प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे की आम्हाला ज्ञानवापी मशिदीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मागे ठेवलं आहे. केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी.”

ते पुढे म्हणाले की, “ज्ञानवापीमध्ये जे शिवलिंग सापडले आहे ते प्राचीन ज्योतिर्लिंग आहे. आम्ही मूर्तीपूजक नसून आत्म्याचे उपासक आहोत. ज्ञानवापीमधील शिवलिंगमध्ये आत्मा असल्याने आम्हाला त्याची पूजा करायची आहे. त्या शिवलिंगची रोज एकदा तरी पूजा झाली पाहिजे. आम्ही देवाला उपाशी ठेवू शकत नाही.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -