घरताज्या घडामोडीयंदाही १२ वीच्या निकालात मुलीच अव्वल; ९५.३५ टक्के मुली उतीर्ण

यंदाही १२ वीच्या निकालात मुलीच अव्वल; ९५.३५ टक्के मुली उतीर्ण

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात ९५.३५ टक्के विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा परीक्षांचा निकाल जाहीर (HSC Result 2022) झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात ९५.३५ टक्के विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावरून मुलींचे कौतुक केले जात आहे. (Most of girls students pass in mahrashtra board HSC Result 2022)

यंदाच्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९३.२९ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

- Advertisement -

बारावीच्या निकालाची मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांना प्रतिक्षा होती. अखेर विद्यार्थ्यांची ही प्रतिक्षा संपली असून, ८ जून रोजी सकाळी निकाल जाहीर झाला आहे. तसेच, दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

राज्याचा निकाल ९४.२२ टक्के

- Advertisement -

यंदाचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के लागला होता. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२२ टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के लागला आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण – ९७.२२ टक्के
  • पुणे – ९३.६१ टक्के
  • कोल्हापूर – ९५.०७ टक्के
  • अमरावती – ९६.३४ टक्के
  • नागपूर – ९६.५२ टक्के
  • लातूर – ९५.२५ टक्के
  • मुंबई – ९०.९१ टक्के
  • नाशिक – ९५.०३ टक्के
  • औरंगाबाद – ९४.९७ टक्के

हेही वाचा – RBI Repo Rate Hike : EMI अधिक महाग होणार, रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -