घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुक कार्यक्रमाबाबत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या पदावर नव्या उमेदवाराची नियुक्ती करण्याकरता लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुक कार्यक्रमाबाबत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी दौरा सुरू करू शकतात. (President election 2022 election commission likely announce election program for president of India election)

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे निकष काय?

- Advertisement -

प्रत्येक पदाच्या उमेदवारासाठी पात्रता निकष ठरवलेले असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांसाठी पात्रता निकष अटी आहेत. त्यानुसार, उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याचे वय ३५ पेक्षा जास्त असावेत. उमेदवाराला ५० आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असावा. हे आमदार आणि खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत असे निकष आहेत.

हेही वाचा – राष्ट्रपती भवनाच्या गच्चीत सापडला ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलेला गरुड

- Advertisement -

दरम्यान, मागच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. तसंच, काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांनाच पाठिंबा दिला होता. यंदाही भाजप नेतृत्त्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा जास्त संख्या आहे. त्यामुळे यंदाही एनडीएचाच उमेदवार यशस्वी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा President Ramnath Kovind : राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं योगदान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार

उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदी निवड करण्याची अप्रत्यक्ष प्रथा तयार झाली होती. परंतु, गेल्या चार टर्ममध्ये उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदाची संधी दिली गेली नाही. भाजपचे कृष्णकांत आणि भैरो सिंह शेखावत हे उपराष्ट्रपती होते, परंतु त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली नाही. त्यांच्या एवजी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, हामिद अन्सारी हे दोन वेळा उपराष्ट्रपदी राहिले मात्र त्यांना राष्ट्रपती पदासाठी संधी मिळाली नाही.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -