घरमहाराष्ट्रवट पौर्णिमेदिवशी तृप्ती देसाईंचं महत्त्वाचं विधान, म्हणाल्या विधवा महिलांना...

वट पौर्णिमेदिवशी तृप्ती देसाईंचं महत्त्वाचं विधान, म्हणाल्या विधवा महिलांना…

Subscribe

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्यातील तमाम महिलांना उद्देशून महत्वाचं विधान केलं आहे.

आज राज्यभर वट पौर्णिमेचा उत्साह आहे. महिला नटून थटून वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत. त्यातच, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्यातील तमाम महिलांना उद्देशून महत्वाचं विधान केलं आहे. (An important statement of Trupti Desai on the day of Vat Pournima)

वट पौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही. माझं सगळ्या महिलांना आवाहन आहे की ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते, त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. यात कोणीही भेदभाव करू नये, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – वटपौर्णिमेदिवशी सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर?

त्या पुढे म्हणाल्या की, वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा संकल्प करावा. यामुळे पर्यावरणाचं आपल्याकडे संवर्धन होईल.

- Advertisement -

ज्याप्रमाणे आपल्याला सत्यवानाची सावित्री जमजली तशीच ज्योतिबाचीही सावित्री समजली आहे. त्यामुळे सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेदिवशी होतो. पण ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यामुळेच मुली शिकत आहेत. प्रगती करत आहेत. महिला उच्चपदी काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -