घरताज्या घडामोडीदहावीचा निकाल उद्या ऑनलाईन दुपारी १ वाजता, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण

दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन दुपारी १ वाजता, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण

Subscribe

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार अशी चर्चा सुरु होती. परंतु अखेर या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलं आहे. उद्या दुपारी म्हणजेच शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल लागणार असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. निकालाची उत्सुकता आता विद्यार्थ्यांना लागली असून काही विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दहावीच्या निकाल शुक्रवारी लागणार असल्याची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

असा पाहा निकाल

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

- Advertisement -

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

-sscresult.mkcl.org

mkcl.org

ssc.mahresults.org.in


हेही वाचा : उद्योगपती गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -