घरमहाराष्ट्रनागपूरनागपुरात मेट्रोचा प्रवास स्वस्त; पण बस, ऑटोरिक्षाचा प्रवास महाग

नागपुरात मेट्रोचा प्रवास स्वस्त; पण बस, ऑटोरिक्षाचा प्रवास महाग

Subscribe

नागपुरात मेट्रोचा (Nagpur Metro) प्रवास स्वस्त झाला आहे. परंतु, बस आणि ऑटोरिक्षाचा (Auto Rickshaw) प्रवास महाग झाला आहे. कारण वाढत्या इंधन (Oil) दराच्या किंमतींमुळे तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

नागपुरात मेट्रोचा (Nagpur Metro) प्रवास स्वस्त झाला आहे. परंतु, बस आणि ऑटोरिक्षाचा (Auto Rickshaw) प्रवास महाग झाला आहे. कारण वाढत्या इंधन (Oil) दराच्या किंमतींमुळे तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. (Nagpur Metro Travel Become Cheap Compare To City Bus And Rikshaw)

इंधन दरात वाढ झाल्याने नागपूर शहर बसच्या प्रवास भाड्यात १६ जूनपासून १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली. किमान भाडे १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर ऑटोरिक्षा चालकांनीही एक किलोमीटरसाठी १८ रुपये दर निश्चत केले आहे. इंधनासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत.

- Advertisement -

दुचाकीस्वारांच्या आर्थिक खर्चातही वाढ

दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे दुचाकीस्वारांच्या आर्थिक खर्चातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता मट्रोचा प्रवास स्वस्त असल्याने नागपुरकरांनी मेट्रोला प्राधान्य दिले आहे. सध्या मेट्रो वर्धा आणि हिंगणा मार्गावर धावत असून त्याचे तिकीट दर ५ रुपये ते १० रुपये आहेत. शिवाय ही वातानुकूलित सेवा असून, विद्यार्थी आणि चाकरमान्यांसाठी सोयीची आहे.

- Advertisement -

सायकल सेवाही उपलब्ध

नागपुरात मेट्रोने प्रवाशांसाठी सायकल सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर ‘ई-बाईक’ आणि सायकल सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रोकडे वळू लागले आहेत. गर्दी वाढल्याने मेट्रोने फेऱ्यांची संख्या वाढवली असून रात्री १० पर्यंत आता मेट्रो धावते.


हेही वाचा – रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; ‘या’ गाड्यांवर होणार परिणाम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -