घरताज्या घडामोडीकेंद्र सरकारकडून खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

Subscribe

केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १ जुलैपासून महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती. मात्र महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ८ हजार रुपयांवरून २७ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.

- Advertisement -

महागाई ईएमआयही महाग होत आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. महागाईच्या आकडेवारीनुसार, जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. देशातील किरकोळ महागाई RBI च्या सहनशीलतेच्या सहा टक्क्यांच्या वर गेली आहे.

दरम्यान, सर्वसाधारणपणे १ जानेवारी आणि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आतुरतेने याची वाट पाहत असून महागाई भत्त्यात वाढ होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अग्निपथ योजनेत मोठा बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -