घरताज्या घडामोडीतेरा घमंड चार दिन का है, पगले हमारी बादशाही खानदानी है, संजय...

तेरा घमंड चार दिन का है, पगले हमारी बादशाही खानदानी है, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Subscribe

या राज्याचे सूत्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील फार घमंड करु नका अगदी स्पष्ट सांगायचे तर तेरा घमंड ४ दिन का है पगले हमारी बादशाही खानदानी है, ती राहणार असा घणाघात संजय राऊतांनी केला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्रात पुढेही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नेतृत्व करतील असे ठाम मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे. तसेच हिंदुत्वाचा बाप एकच असून ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहेत. राऊत म्हणाले की, शिवसेनेचा ५६ वाढदिवस आहे. हा वाढदिवस नाही तर तुफानाचा वाढदिवस आहे. अब तक ५६ आता पुढे बरच आहे. हे राजकीय विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. फार घमंड काही लोकांना राजकारणात आली आहे. राज्यसभेचा निवडणुका झाल्या पार पडल्या ठिक आहे. एखादी जागा इकडे तिकडे होऊ शकते. विधान परिषदेसाठी घालमेल सुरु आहे. एक जागा जिंकली म्हणजे महाराष्ट्र जिंकला असे नाही. या राज्याचे सूत्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील फार घमंड करु नका अगदी स्पष्ट सांगायचे तर तेरा घमंड ४ दिन का है पगले हमारी बादशाही खानदानी है, ती राहणार आणि ती दिसेल या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कोणाची झाली नाही. संपूर्ण देश आज पेटला आहे. असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे शांत

अग्निवीर काय असतं खरे अग्निवीर समोर बसले आहेत. तुम्ही कोणते अग्निवीर भरती करणार आहे. सैन्य कोट्यातून भरती होतात माहिती होते परंतु आता कंत्राटपद्धतीने सैन्यात भरती करण्यात येत आहे. देशाचे रक्षण कोणी करायचे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात सूत्र आहे. ठेकेदारीपद्धतीने गुलाम नेमले जातात. मोदींच्या निर्णयामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शांत आहे परंतु खदखदतोय , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हाती सूत्र असल्यामुळे महाराष्ट्र शांत आहे. सूत्र जोपर्यंत आमच्याकडे आहेत तोपर्यंत राज्य स्थीर राहिल. अनेक दिशामधून प्रयत्न सुरु आहे. पण तुम्हाला ते जमणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

या देशात अराजकता सुरु आहे. श्रीलंकेमध्ये जेव्हा जनता रस्त्यावर उतरली तेव्हा या देशाची स्थिती सारखीच होण्यास वेळ लागणार नाही असे म्हणालो होतो. आता देशातील शिकलेली लोकं, बेरोजगार, अनेक तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या तरुणांना रोखण्यासाठी सैन्याला आणावे लागत आहे. याला राज्य केलं म्हणत नाही. राज्य कसं केलं पाहायचे असेल तर महाराष्ट्रात पाहा.

- Advertisement -

हेही वाचा : बाळासाहेबांमुळेच राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, संजय राऊतांचं मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -